Sidhu moose Wala : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर कंगनाचा पंजाब सरकारवर निशाणा; पोस्ट शेअर करत म्हणाली...
कंगनानं (Kangana Ranaut) या पोस्टमधून पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.
Sidhu moose Wala : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून कंगनानं शोक व्यक्त केला आहे. तसेच कंगनानं या पोस्टमधून पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.
कंगनानं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, 'पंजाबमधील प्रसिद्ध व्यक्ती सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना खूप दु:खी करणारी आहे. ही घटना पंजाबच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काय स्थिती आहे, हे दाखवते.'
कंगनाची पोस्ट
सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. शहनाज गिल, भगवंत मान आणि करण कुंद्रा या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.
सिद्धू मुसेवाला यांनी गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'लायसेन्स' असे त्यांच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. 'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळवली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू हे रातोरात स्टार झाले.
पाच जण ताब्यात
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी डेहराडून येथून पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा :