(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sidhu Moosewala Murder Case : सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा
Sidhu Moosewala Murder Case : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम अहवाल आला आहे. यामध्ये मोठी माहिती उघड झाली आहे.
Sidhu MooseWala Murder Case : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या (Sidhu Moosewala) मृतदेहाचं सोमावारी पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. या अहवालात सिद्धधूच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तर शरीरात एक गोळीही सापडली आहे. सिद्धू यांच्या खांद्यावर आणि मांड्यांवर जखमांच्या खुणा आढळल्याची माहिती पोस्टमार्टम अहवालातून समोर आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या पर्थिवावार आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
प्राथमिक तपासामध्ये जखमांमुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे सिद्धू यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर आज सिद्धू यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजता अंत्संयस्कार करण्यात येणार आहेत. मानसा सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. रणजित राय यांनी सांगितले की, पोस्टमार्टम अहवाल लवकरच सीलबंद लिफाफ्यामध्ये पोलिसांना पाठवला जाईल.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी महत्त्वपूर्ण सुगावा लागल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, काही लोकांची चौकशी केल्यानंतर अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सिद्धूची हत्या करण्यापूर्वी त्याच्या वाहनाचा पाठलाग केला जात असल्याचं सोशल मीडियावर समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतं आहे.
पाच जण ताब्यात
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी डेहराडून येथून पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून केली हत्या
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांसोबतच, रविवारी मानसा येथील ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्यांचीही चौकशी आणि तपास पोलीस करत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज त्या ढाब्याचं आहे जेथे आरोपींनी जेवण केलं होतं. सूत्रांनी सांगितले की, सोशल मीडियावर आणखी एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे, ज्यामध्ये मुसेवाला यांच्या हल्ल्यापूर्वी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं आहे.
संबंधित बातम्या
- पंजाबमधील आप सरकारने काल सुरक्षा काढून घेतली, आज काँग्रेस नेते आणि गायक सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या
-
सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तिहार जेलमध्येच रचला, दिल्ली पोलिसांच्या हाती लागली महत्वपूर्ण माहिती
- Sidhu Moosewala Murder : सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कोणी केली? गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी