Kangana Ranaut च्या 'धाकड'ची रिलीज डेट जाहिर; कंगानाच्या लूकची जोरदार चर्चा
कंगनाने या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे.
मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईतील जुहूमधील एका प्रसिद्ध लाउंजच्या बाहेर तिच्या आगामी चित्रपटाचा म्हणजेच धाकडचा पोस्टर लॉंच केला. या पोस्टरध्ये चित्रपटाची रिलीज डेट देखील सांगण्यात आली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 8 एप्रिल रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. धाकड या चित्रपटच्या पोस्टरमधील कंगनाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. धाकड चित्रपटाचे निर्माता दीपक मुकुट यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये कंगनाने उपस्थिती लावली. त्यावेळी तिने या चित्रपटाचे पोस्टर लॉंच केले.
धाकड स्पाय थ्रिलर चित्रपट आहे: कंगना
मीडियासोबत बोलताना कंगनाने या चित्रपटाबद्दलच्या उत्सुकतेबद्दल सांगितले. तिने सांगितले की, 'धाकड हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट क्रांतीकारी ठरणार आहे.' यावेळी तिने लोकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. कंगनाने या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांची आणि तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
पार्टीमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल यांनी देखील लावली होती हजेरी.
धाकड या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकुट यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला कंगनासोबतच सनी देओल आणि बॉबी देओल यांनी देखील हजेरी लावली होती. सनी आणि बॉबी यांनी दीपक मुकुट दिग्दर्शित 'अपने 2' या चित्रपटामध्ये काम केले आहे.