एक्स्प्लोर

IND vs ENG T20 World Cup Semi Final : जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video

Axar Patel catch Will Jacks Gautam Gambhir Reaction : संजू सॅमसनची 89 धावांची तुफानी खेळी आणि अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे सामना भारताच्या बाजूने फिरला.

IND vs ENG T20 World Cup 2026 Semi-Final : टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. संजू सॅमसनची 89 धावांची तुफानी खेळी आणि अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे सामना भारताच्या बाजूने फिरला. मात्र या सर्वांबरोबरच इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा ‘बापू’ अक्षर पटेल मैदानावर हिरो ठरला.

या सामन्यात अक्षर पटेलने केलेल्या करिश्माई फिल्डिंगने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची मने जिंकली. विल जॅक्सचा घेतलेला त्यांचा अफलातून कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा कॅच इतका थरारक होता की भारतीय खेळाडूंमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला. इतकेच नव्हे तर डगआउटमध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही हा क्षण पाहून खुर्चीतून उडी मारून आनंद व्यक्त करताना दिसले.

विल जॅक्सचा कॅच पकडण्यासाठी अक्षर पटेलने जवळपास 20 ते 30 मीटरपर्यंत वेगाने धाव घेतली. चेंडू पकडताना तो बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ पोहोचला. मात्र चपळाई दाखवत त्यांनी योग्य वेळी चेंडू शिवम दुबेकडे हवेत फेकला.  या कॅचनंतर स्टेडियममधील चाहत्यांनी जल्लोष केला. या सामन्यात अक्षर पटेलने एकूण दोन कॅच घेतले आणि एक विकेटही मिळवली. त्याने तीन षटके टाकत 25 धावा देत 1 विकेट घेतली. मात्र विल जॅक्सचा घेतलेला तो कॅचच सामन्याचा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरला. 

गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला... (Gautam Gambhir Reaction)

नेहमी शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही या अप्रतिम फिल्डिंगनंतर आपला आनंद आवरता आला नाही. शिवम दुबेने झेल पूर्ण करताच गंभीर खुर्चीवरून उठला आणि पळत सुटला. गंभीरचा हा भन्नाट सेलिब्रेशनचा क्षण आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

टीम इंडियाची इतिहासात नोंद... 

या शानदार विजयासह भारताने टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (4 वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ बनण्याचा मान पटकावला आहे. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून, चाहत्यांना एका थरारक लढतीची उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा -

IND vs NZ Final T20 World Cup : अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती OUT, रिंकू, कुलदीप IN.... टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Black Magic : आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
GT vs MI Live Score IPL 2026 : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
GT vs MI Live Updates : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
Suryakumar Yadav GT vs MI IPL 2026 : सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
Who is Danish Malewar : बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
Embed widget