(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Kapil Sharma : कॉमन मॅन ते कॉमेडी किंगपर्यंतचा प्रवास खडतर प्रवास! वाचा अभिनेता कपिल शर्माबद्दल...
Kapil Sharma Birthday Special : कपिल शर्मा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो 'द कपिल शर्मा शो' या शोमुळे घराघरांत पोहोचला.
Kapil Sharma Birthday Special : कॉमेडी किंग अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) आज (2 एप्रिल) त्याचा 41वा वाढदिवस साजरा करणार आहे. कपिलचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसरमध्ये झाला. कपिलच्या वडिलांना क्रिकेटची आवड होती. त्यामुळे कपिल देव यांच्यापासून प्रेरित होऊन, त्यांनी आपल्या मुलाचे नाव कपिल असे ठेवले. कपिल शर्माने 2018मध्ये त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न केले. कपिल शर्मा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो 'द कपिल शर्मा शो' या शोमुळे घराघरांत पोहोचला. यासह कपिलने फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी लिस्टमध्ये टॉप 100 मध्ये स्थान मिळवले आहे.
लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करणारा कपिल शर्मा आज भले मोठा स्टार झाला असेल, पण एक काळ असा होता जेव्हा, त्याला पैशासाठी पीसीओमध्ये काम करावे लागत होते. कॉमन मॅन ते कॉमेडीचा बादशाह बनण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास खूप खडतर होता.
बनायचं होतं गायक, पण...
आज जरी कपिल कॉमेडी किंग म्हणून ओळखला जातो, पण कधीकाळी कपिलला गायक व्हायचे होते. 2005 मध्ये कपिलला एका पंजाबी वाहिनीवरील कॉमेडी शोमध्ये कॉमेडी करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा फायदा घेतला. या शोमध्ये तो सेकंड रनर अप ठरला होता आणि हा शो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर कपिल थांबला नाही आणि 2007 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या सीझन 3मध्ये त्याने भाग घेतला आणि तो शोचा विजेता बनला. 2010 ते 2013 या कालावधीत 'कॉमेडी सर्कस'चा विजेता ठरला. तेव्हापासून आजतागायत त्यांची गाडी थांबलेली नाही.
पीसीओमध्ये करायचा अभिनेता
कपिलची आई जनक राणी यांनी सांगितले की, कपिलने अमृतसरमध्ये पीसीओमध्ये काम करायला सुरुवात केली. खरंतर कपिलचे वडील कॅन्सरने त्रस्त होते. वडिलांच्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यानंतर कपिलने घर चालवण्यासाठी टेलिफोन बूथवरही काम केले. पदवी शिक्षणानंतर कपिल मुंबईत आला. वडिलांच्या निधनानंतर कपिलने कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि ती चोख पार पाडली.
2007 मध्ये तो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' सीझन 3 चा विजेता बनला, त्याला बक्षीस म्हणून 10 लाख रुपये मिळाले. जेव्हा कपिल शर्माने हा शो जिंकला तेव्हा त्याने फोन करून ही गोष्ट घरच्यांना सांगितली, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला, तेव्हा कपिल शर्माने खरोखरच इतके लाखो रुपये जिंकल्याची सर्वांना खात्री पटली. कपिलने बहिणीच्या लग्नासाठी हा सगळा पैसा खर्च केला.
फोर्ब्सच्या यादीत स्थान!
कपिलने 2013 मध्ये प्रथमच ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटीं’च्या यादीत स्थान मिळवले. यामध्ये त्याला 93 वे स्थान मिळाले होते आणि 2014 मध्ये तो 33व्या स्थानावर गेला. यासह कपिलने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.
हेही वाचा :
- Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' मालिकेतील राजेश्वरी अखेर लग्नासाठी तयार
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर अशोक सराफ लावणार हजेरी, सूरांच्या मंचावर पसरणार उत्साह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha