Grammy Awards 2024 : तीन ग्रॅमी अॅवार्ड पटकावले पण स्टेजवरून उतरताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या; दिग्गज रॅपरने केले काय?
Grammy Awards 2024 : तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर स्टेजवरून उतरताच दिग्गज रॅपरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Grammy Awards 2024 : अमेरिकेतील 66 व्या ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards 2024) सोहळ्यात धक्कादायक नाट्यमय घडामोडी घडल्या. यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात रॅपर सिंगर किलर माईक (Killer Mike) याने तीन पुरस्कार पटकावले. मात्र, पुरस्कार स्वीकारल्यानंतर रॅपर किलर माईकला पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.
तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर रॅपर किलर माइकला लॉस एंजेलिस पोलिसांनी क्रिप्टो एरिनामधून त्याला बेड्या घालत अटक केली. या प्रकरणी लॉस एंजेलिस पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, पोलिसांनी एका पुरुषाला ताब्यात घेतल्याची पुष्टी केली. याबाबत अधिक तपशील दिले नाहीत. किलर माईकच्या प्रतिनिधीने याबाबत अधिक भाष्य केले नाही. विविध वृत्तसंस्थांनी याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, माईकच्या टीमकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, काही वृत्तांनुसार एका आरोपात किलर माईकवर ही कारवाई करण्यात आली.
#GRAMMYS: #KillerMike 🙌🏾👏🏾 winner of the “Best Rap Album”, “Best Rap Performance” and “Best Rap Song” poses with his Awards 🏆🏆🏆 (📸 Getty) pic.twitter.com/KsV0026w5L
— Power 105.1 (@Power1051) February 4, 2024
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस किलर माइकला पाठीमागे हात बांधून लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिनापासून दूर नेताना दिसत आहेत.
Killer Mike arrested at the Grammys after winning three awards #grammys #killermike pic.twitter.com/TzAsy7S4vQ
— wetindeyhappenTV (@officialwdhtv) February 5, 2024
दरम्यान, रॅपरने सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स, रॅप साँग आणि रॅप अल्बमसाठी पुरस्कार जिंकले. रॅपर किलर माईकला 'सायंटिस्ट्स अँड इंजिनिअर्स'साठी पहिला सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्ससाठी पुरस्कार मिळाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट रॅप साँगचा पुरस्कारही जिंकला. 'मायकल'साठी त्याचा सर्वोत्कृष्ट रॅप अल्बमसाठी ही पुरस्कार मिळाला. माइकने शेवटचा ग्रॅमी 2003 मध्ये 'द होल वर्ल्ड'साठी जिंकला होता.
पुरस्कार मिळवल्यानंतर व्यक्त केला आनंद
पुरस्कार जिंकल्यानंतर किलन माईकने म्हटले की, 'तुमच्या वयावर मर्यादा आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमच्या वयाबद्दल किंवा तुम्ही जे करत आहात त्याबद्दल प्रामाणिक न राहणे. त्याने पुढे म्हटले की, वयाच्या 20 व्या वर्षी मला वाटले की ड्रग डीलर बनणे चांगले होईल. वयाच्या 40 व्या वर्षी मी पश्चात्ताप आणि मी केलेल्या गोष्टींसह जगू लागलो. 45 व्या वर्षी रॅपिंग सुरू केले असल्याचे म्हटले.
वर्णद्वेषाविरोधात माईकने उठवला आवाज
संगीताशिवाय किलर माईक हा अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या अधिकारासाठी आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. नेटफ्लिक्सवरील 'ट्रिगर वॉर्निंग विथ किल माईक' हा शो होस्ट केला होता. कृष्णवर्णीय समुदायांचे प्रश्न मांडणारी ही 2019 मधील डॉक्युमेंट्री होती.