एक्स्प्लोर
मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षांवरून 21 करण्याबाबत आर्ची म्हणते...
मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यात. यावर मराठी चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरूने प्रतिक्रिया दिलीय.
![मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षांवरून 21 करण्याबाबत आर्ची म्हणते... girls marriage age will increase said minister nirmala sitaraman मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षांवरून 21 करण्याबाबत आर्ची म्हणते...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/02223627/Rinku-Rajguru.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याबाबत केंद्र सरकार विचाराधीन आहे. याला रिंकू राजगुरू उर्फ आर्चीने आपला पाठींबा दर्शवलाय. जर हा निर्णय लागू झाला तर मुलींसाठी हा योग्य निर्णय असेल, असं मत तिने व्यक्त केलंय. मेकअप चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रिंकू सांगलीत आली होती. यावेळी तिने एबीपी माझाशी दिलखुलास सवांद साधला.
मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा विचार चालू आहे. ही मुलींसाठी चांगली गोष्ट आहे, वयावरती लग्न ठरू शकत नाही. जेव्हा मुलगी मनाने मोठी होते, तेव्हा ती लग्न करण्यास तयार असते. त्यामुळे जर हा कायदा लागू झाला तर मुलींना शिकण्यासाठी आणखी वेळ मिळेल, मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, असा विश्वास रिंकूने व्यक्त केलाय. यावेळी नाईट लाइफच्या प्रश्नावरून सोशल मीडियावर ट्रोल केल्याबाबत विचारले असता, मी मुंबईत फारशी न राहिल्याने मला नाईट लाईफबद्दल काही माहिती नव्हते. मुंबई कधीच झोपत नाही, हे फक्त मला माहित आहे, असं म्हणत ट्रोल करणाऱ्यांना रिंकूने उत्तर दिलय.
अमृता, सई की रिंकू; मराठीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?
मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार टास्क फोर्स -
मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. हा टास्क फोर्स सामाजिक, आर्थिक आणि मानसिक गोष्टींचा विचार करुन सहा महिन्यात आपल्या शिफारसी सरकारला सादर करणार आहे. आई होण्याचं नेमकं वय काय असावं? बदललेली परिस्थिती पाहता मुलीच्या लग्नासंदर्भातली कायदेशीर वयोमर्यादा वाढवण्याची वेळ आलीय का? हे सवाल उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे. अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारमण यांनी एक मोठं आणि तेवढंच महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मातृत्वाची, म्हणजेच आई होण्याची वयोमर्यादा निश्चित करण्यासंदर्भात सरकार गांभीर्यानं विचार करतंय. त्यासाठी सरकार टास्क फोर्सची स्थापना करणार आहे. हा टास्क फोर्स सहा महिन्यात अहवाल सादर करेल. त्यानुसार सरकार आई होण्याच्या वयासंदर्भात धोरण जाहीर करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
Marriage Age of Girls | मुलींच्या लग्नाच्या वयाचा केंद्र सरकारकडून पुनर्विचार, लग्नाचं वय 18वरुन 21 होण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)