एक्स्प्लोर

अमृता, सई की रिंकू; मराठीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?

अभिनेत्रींना मराठीमध्ये साधारण 15 लाखांच्या घरात मानधन मिळतं. पण यावर कडी केलीय रिंकूने. रिंकूचं मानधन ऐकाल तर थक्क व्हाल. बाबो...

मुंबई : सैराट आला आणि भल्याभल्यांची दिलं आर्चीच्या दरवाजावर येऊन धडकली. इंग्रजीचं झेड माहित नसलेल्या मुलालाही, तिच्या इंग्लिशमध्ये सांगू का.. लाजवून गेलं. त्यानंतर पुढं रिंकू दिसली 'कागर'मधून. तिथंही तिचं कौतुक झालं आणि रिंकूचा बाजारातला भाव वधारला. बोर्डाची परीक्षा असो किंवा पिक्चर.. मीडियावाले हटकून तिची दखल घेतात हे सिनेमाच्या निर्मात्यांना बरोब्बर कळलंय. म्हणूनच वाट्टेल ती किंमत देऊन रिंकूला सिनेमा घेण्याची धडपड चालू आहे. म्हणूनच मंडळी सध्या मराठी इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या हिरोइन्समध्ये रिंकूने नंबर एक मिळवला आहे. आजपर्यंत सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी अशा ग्लॅमरस तारकांच्या मानधनाची चर्चा व्हायची. अभिनेत्रींना मराठीमध्ये साधारण 15 लाखांच्या घरात मानधन मिळतं. पण यावर कडी केलीय रिंकूने. रिंकूचं मानधन ऐकाल तर थक्क व्हाल. बाबो... आगामी 'मेकअप' सिनेमात रिंकू दिसणार आहे. या सिनेमासाठी तिने किती मानधन घेतलंय माहितीय का... एनी गेसेस... तर या सिनेमासाठी निर्मात्याने रिंकूला देऊ केलेत तब्बल 27 लाख रुपये. तुम्ही म्हणाल. काय.. इतके पैसे.. तर होय. एका सिनेमासाठी इतक्या नवख्या अभिनेत्रीला 27 लाख मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिंकूची सगळी मॅनेजमेंट दिग्दर्शक नागराज मंजुळेची निर्मिती संस्था आटपाट करतं. तर आटपाट आणि निर्मात्यांमध्ये नुकताच रिंकूच्या मानधनाचा करार झाला आहे. रिंकूची मॅनेजमेंट तर आटपाट करतंच. शिवाय, रिंकूसाठी लागणारी सगळी सिक्युरिटीही आटपाट पुरवतं. पण ते आधीपासून आहे. असो. एक नक्की.. ही सगळी कन्फर्म चर्चा आहे हं 'मेकअप' सिनेमाच्या गोटातली. दबक्या आवाजात बोलतायत सगळे. पण याला अधिकृत दुजोरा द्यायला मात्र कुणी तयार नाही. तर ते महत्त्वाचं नाही. तर मराठी सिनेमा आता घोडदौड करतोच आहे, त्याचवेळी कलाकारांचे गुण हेरुन निर्मातेही त्यांना मान आणि धन दोन्हीही भरभरुन देत आहेत असंच म्हणायला हवं, नाही का?

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare On Ranbir Kapoor Ramayana Movie: 'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget