Farhan Akhtar, Shibani Dandekar : 'तू अशीच हसत राहा...'; फरहाननं शेअर केला शिबानीसोबतचा रोमँटिक फोटो
नुकताच फरहाननं (Farhan Akhtar) एक खास फोटो शेअर केला आहे.
Farhan Akhtar, Shibani Dandekar : बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. नुकताच फरहाननं एक खास फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये शिबानी आणि फरहान खळखळून हसताना दिसत आहेत. या फोटोला फरहाननं हटके कॅप्शन दिलं असून त्याच्या या पोस्टला शिबानीनं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
फरहानची पोस्ट
फरहाननं लग्नातील शिबानीसोबतचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'तू अशीच हसत रहा आणि मी तुला पहात राहिल. ' फरहाननं शेअर केलेल्या या फोटोला शिबानीनं कमेंट केली, 'माझ्या आयुष्यात प्रेम आणि हास्य आणल्याबद्दल धन्यवाद, खूप प्रेम' फरहान आणि शिबानीनं लग्नसोहळ्यामध्ये खास लूक केला होता. शिबानीनं रेड कलरचा क्रोसेट टॉप आणि स्कर्ट असा लूक केला होता तर फरहाननं ब्लॅक कोट आणि पँट अशा आऊट फिटमधील लूक केला होता.
View this post on Instagram
शिबानीची बहिण अनुशा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता ह्रतिक रोशन, फरहानची बहिण जोया अख्तर, अमृता अरोरा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी या सेलिब्रिटींनी फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. . फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला होता.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha