Jawan Prevue Twitter Review: कुणी म्हणतंय 'बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार' तर कुणी म्हणतंय 'किंग शाहरुख खान'; जवानचा प्रीव्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 Jul 2023 04:45 PM
Telly Masala : 'बाईपण भारी देवा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे आणि स्वातीची प्यारवाली लव्हस्टोरी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या... Read More
Jawan Prevue Twitter Review: कुणी म्हणतंय 'बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार' तर कुणी म्हणतंय 'किंग शाहरुख खान'; जवानचा प्रीव्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया
शाहरुखच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा प्रीव्यू आज (10 जुलै) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रीव्यूचं सध्या सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत. Read More
Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर महिलाराज्य! 'बाईपण भारी देवा'ने आतापर्यंत केली 29.05 कोटींची कमाई
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. Read More
Rekha And Jaya Bachchan: जेव्हा जया बच्चन आणि रेखा आल्या होत्या समोरासमोर; पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल
नुकताच जया बच्चन (Jaya Bachchan) आणि रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More
Ajay Purkar : घोडखिंडीत जी लढाई झाली त्याच भूमीत घर बांधलय पावनखिंड फेम अजय पुरकरांनी; जाणून घ्या त्यांच्या घराची गोष्ट...
Ajay Purkar : अजय पुरकर यांनी पावनखिंडीत (Pawankhind) जी लढाई झाली त्याच लढाईच्या भूमीत नवं घर बांधलं आहे. Read More
Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये डंका; हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये साकारल्या भूमिका
हिंदी मनोरंजनसृष्टीत काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात... Read More
Salman Khan : 'बिग बॉस ओटीटी 2'च्या मंचावर सलमान खानने ओढली सिगरेट; फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी घेतली भाईजानची शाळा
Salman Khan : कॅमेरासमोर सिगरेट ओढतानाचा सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Jawan Prevue : शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये; प्रीव्यूमध्ये दिसली झलक
जवान (Jawan) चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची झलक दिसली. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल... Read More
Dattu More : डॉक्टर स्वातीने पटवलंय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला; जाणून घ्या प्यारवाली लव्हस्टोरी...
Dattu More Love Story : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला. Read More
Veena Jagtap: मॅट्रिमोनियल साईटवर वीणा जगतापचं फेक अकाऊंट; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली, 'हिंमत'
नुकतीच वीणानं (Veena Jagtap) एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टच्या माध्यमातून तिनं मॅट्रिमोनियल साईटवरील तिच्या फेक अकाऊंटची माहिती नेटकऱ्यांनी दिली आहे.  Read More
Adipurush : प्रेक्षकांची नापसंती मिळालेला ओम राऊतचा 'आदिपुरुष' युट्यूबवर लीक; काही मिनिटांतच मिळाले दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज
Adipurush Leaked : 'आदिपुरुष' हा सिनेमा आता युट्यूबवर लीक झाला आहे. Read More
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची जलसाबाहेर गर्दी; बिग बीं शेअर केला खास व्हिडीओ
नुकताच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. Read More
Bollywood Actress Education : शाळेत न गेलेली कतरिना ते सर्वात कमी शिकलेली करिष्मा; बॉलिवूडमधील नायिकांचे शिक्षण किती? जाणून घ्या...
Bollywood Actress Education : बॉलिवुडमध्ये काम करून कोट्यावधींची कमाई करणाऱ्या या नायिकांचे शिक्षण किती झाले आहे हे तुम्हाला कळले तर चकितच व्हाल. Read More
Shah Rukh Khan : "मैं कौन हूँ, कौन नहीं...नाम तो सुना होगा"; शाहरुखच्या 'जवान'चा अ‍ॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट
Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाचा प्रीव्यू आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Somy Ali : 'छळ आणि अत्याचार...'; सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
नुकतीच सोमीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Anushka Sharma Virat Kohli : लंडनमधील गल्ल्यांमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा रोमँटिक अंदाज; व्हिडीओ व्हायरल
Anushka Sharma Virat Kohli London Trip : अनुष्का शर्माने सोशल मीडियावर लंडन ट्रिपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. Read More
Hema Malini : "त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली"; हेमा मालिनींचा गौप्यस्फोट
Hema Malini : हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शकाबाबत गौप्यस्फोट केला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.