Adipurush : प्रेक्षकांची नापसंती मिळालेला ओम राऊतचा 'आदिपुरुष' युट्यूबवर लीक; काही मिनिटांतच मिळाले दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज
Adipurush Leaked : 'आदिपुरुष' हा सिनेमा आता युट्यूबवर लीक झाला आहे.
Adipurush Leaked On Youtube : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांनी नापसंत केला आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा आता पायरसीचा शिकार झाला आहे. रिलीजनंतर आता हा सिनेमा युट्यूबवर लीक झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' हा सिनेमा एचडीमध्ये (HD Version Leaked) युट्यूबवर लीक झाला. काही मिनिटांतच या सिनेमाला 2.3 मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने युट्यूबवर मात्र चांगलाच गल्ला जमवला आहे. आता युट्यूबवरदेखील हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'आदिपुरुष' (Adiprush Controversy)
ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमातील संवाद आणि पात्रांच्या लूकवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावनांचा आदर तर निर्मात्यांनी या सिनेमातील संवाद बदलले. पण तरीही विरोध मात्र कायम राहिला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी 'आदिपुरुष'चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी ट्वीट करत धार्मिक भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागितली.
View this post on Instagram
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. 600 कोंटीच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने जगभरात 450 कोटींची कमाई केली आहे. हिंदी वर्जनने फक्त 147.26 कोटींची निर्मिती केली आहे. भूषण कुमारने (Bhushan Kumar) या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेवर या सिनेमाची तुलना होत आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'आदिपुरुष' (Adipurush Star Cast)
आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. आता प्रभासच्या 'सालार' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या