Shah Rukh Khan : "मैं कौन हूँ, कौन नहीं...नाम तो सुना होगा"; शाहरुखच्या 'जवान'चा अॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट
Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाचा प्रीव्यू आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Shah Rukh Khan Jawan Prevue : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट झाला आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा प्रीव्यू सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
शाहरुखच्या 'जवान' (Jawan) या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. प्रीव्यूवरुन याचा अंदाज येत आहे. प्रीव्ह्यूची सुरुवात किंग खानच्या दमदार आवाजाने होत आहे. तो म्हणतो आहे,"मैं कौन हूँ, कौन नहीं, पता नहीं, ना तो कोई इरादा हूं. पुण्य हूँ या पाप हूँ ये खुद से पूछना क्योंकि मैं भी आप हूँ... रेडी... नाम तो सुना होगा".
View this post on Instagram
शाहरुखने शेअर केला 'जवान'चा प्रीव्यू (Shah Rukh Khan Shared Jawan Prevue)
'जवान'च्या प्रीव्यूमध्ये विजय सेतुपती, नयनतारा आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. 'जवान'मध्ये दीपिका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात शाहरुख वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे. किंग खानने सोशल मीडियावर 'जवान'चा प्रीव्यू शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"मैं कौन हूँ, कौन नहीं.. जाने के लिए रेडी हो. 'जवान'चा प्रीव्यू आऊट. 7 सप्टेंबरला 'जवान' हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत जगभरात प्रदर्शित होणार आहे".
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार शाहरुखचा 'जवान' (Jawan Relesed Date)
शाहरुखचा 'पठाण' हा ब्लॉकस्टरर सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर चाहते त्याच्या आगामी सिनेमांची प्रतीक्षा करत आहेत. त्याचा आगामी 'जवान' (Jawan Released Date) हा सिनेमा आधी 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर 12 जुलैला या बहुचर्चित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या