Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची जलसाबाहेर गर्दी; बिग बीं शेअर केला खास व्हिडीओ
नुकताच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. एग्री यंग मॅन, बिग बी असंही अमिताभ बच्चन यांना म्हटलं जातं.अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक वेळा बिग बींची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर गर्दी करतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी जलसा या बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी चाहत्यांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसते की,जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी आहे. त्यानंतर बंगल्याचे गेट उघडले जाते आणि तिथे अमिताभ बच्चन येतात. बिग बींना पाहून चाहते खुश होतात. या व्हिडीओला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कॅप्शन दिलं,'जे येतात त्यांच्यासाठी अनंत प्रेम.. मी आज जे आहे, त्यांच्यामुळेच आहे.'
अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच त्यांचा प्रोजेक्ट के हा चित्रपट रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी 'प्रोजेक्ट के' असं लिहिलेली हुडी परिधान केलेली दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
'प्रोजेक्ट के' या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'सेक्शन 84' या चित्रपटात देखील अमिताभ बच्चन काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: