Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये डंका; हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये साकारल्या भूमिका
हिंदी मनोरंजनसृष्टीत काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात...
Marathi Actress: सध्या अनेक मराठी कलाकार हे बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमधून हे मराठमोळे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच जवान (Jawan) या चित्रपटाचा प्रीव्यू रिलीज झाला. या प्रीव्यूमध्ये मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकची (Girija Oak) झलक दिसली. हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करत असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात...
तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटामध्ये "शूर्पणखा" ही भूमिका साकारली. तेजस्वीनीनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. ये रे ये रे पैसा, मी सिंधुताई सपकाळ, देवा या मराठी चित्रपटांमधून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच तेजस्विनीनं कालय तस्मै नमः, लज्जा या मालिकांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
क्षिती जोग (Kshitee Jog)
रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी हिंदी चित्रपटामधून क्षिती जोग ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्षितीनं झिम्मा, सनी, चोरीचा मामला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
गिरिजा ओक (Girija Oak)
जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये अभिनेत्री गिरिजा ओकची (Girija Oak) झलक दिसली. जवान या चित्रपटात गिरिजाचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गिरिजा ओकनं मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
राधिका आपटे (Radhika Apte)
राधिका आपटे ही सेक्रेड गेम्स, घूल आणि ओके कम्प्युटर यांसारख्या हिंदी वेब सीरिजमधून राधिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तिनं पॅडमॅन आणि अंधाधूंद या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मिथिला पालकर (Mithila Palkar)
'कप सॉन्ग' मुळे मिथिला पालकरला विशेष लोकप्रियता मिळाली. मिथिलानं ‘लिटिल थिंग्स’ या वेब सीरिजमध्ये काम केलं. तसेच 'कारवां' या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मुरांबा या मराठी चित्रपटामधील मिथिलाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.ॉ
प्रिया बापट (Priya Bapat)
प्रिया बापटनं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या हिंदी वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: