Jawan Prevue Twitter Review: कुणी म्हणतंय 'बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार' तर कुणी म्हणतंय 'किंग शाहरुख खान'; जवानचा प्रीव्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया
शाहरुखच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा प्रीव्यू आज (10 जुलै) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रीव्यूचं सध्या सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत.
![Jawan Prevue Twitter Review: कुणी म्हणतंय 'बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार' तर कुणी म्हणतंय 'किंग शाहरुख खान'; जवानचा प्रीव्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया Jawan Prevue Twitter Review shah rukh khan nayanthara and vijay sethupathi film Jawan Prevue Twitter Review: कुणी म्हणतंय 'बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार' तर कुणी म्हणतंय 'किंग शाहरुख खान'; जवानचा प्रीव्यू पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/10/c3505d7ee36d2837240e4434a9c050981688983946634259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jawan Prevue Twitter Review: अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) चार वर्षांच्या ब्रेकनंतर 'पठाण' चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता शहारुखचे चाहते त्याच्या 'जवान' (Jawan) आगामी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा प्रीव्यू आज (10 जुलै) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रीव्यूचं सध्या सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अनेक नेटकरी ट्वीट शेअर करुन 'जवान' चित्रपटाच्या प्रीव्यूचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं, 'जवानचा प्रीव्यू बेस्ट आहे. मला डिस्क्राइब करायला शब्द सुचत नाहीयेत. यामधील स्टंट, डायलॉग, बीजीएम आणि एसआरकेचा आवाज सगळं चांगलं आहे. आता बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार आहे. ब्लॉकबस्टर'
#JawanPrevue is the bestest teaser ever i watched 💥🔥 No other word can describe it! The stunts, the dilouge, bgm, it is pure class and mass. Oh my goodness srk voice + bgm 🥵
— 𝐁𝐀𝐁𝐀 𝐘𝐀𝐆𝐀 (@yaga_18) July 10, 2023
A TSUNAMI at the box office loading 🔥
B L O C K B U S T E R ⭐⭐⭐ pic.twitter.com/ncFOWDmFvs
The Walk that will shatter every existing box office records.
— Arijit (FAN) (@SRKsArijit) July 10, 2023
KING SHAH RUKH KHAN IS HERE 🔥#JawanPrevue pic.twitter.com/gumdkSvirt
एका नेटकऱ्यानं 'जवान' चित्रपटाचा प्रीव्यू पाहिल्यानंतर ट्वीट शेअर करुन शाहरुखच्या लूकचं कौतुक केलं आहे.
these two looks are gonna create rampage in theatres 🔥 #JawanPrevue #Jawan pic.twitter.com/5jGJiOS1Gt
— ح (@hmmbly) July 10, 2023
जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये शाहरुख हा विविध लूकमध्ये दिसत आहे. प्रीव्यूमधील शाहरुखच्या अॅक्शन अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूच्या शेवटी शाहरुख हा 'बेकरार करके हमें यूँ न जाइये' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
जवान चित्रपटाची स्टार कास्ट
जवान या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील दिसणार आहे. जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)