Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर महिलाराज! 'बाईपण भारी देवा'ने आतापर्यंत केली 29.05 कोटींची कमाई
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Bapan Bhaari Deva) या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 30 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या दहा दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा बोलबाला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'बाईपण भारी देवा'ने रिलीजच्या अकरा दिवसांत 29.05 कोटींची कमाई केली आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाची रिलीजआधीपासूनच चर्चा होती. जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे.
'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection Day 11)
- पहिला दिवस : 1.05 कोटी
- दुसरा दिवस : 2.3 कोटी
- तिसरा दिवस : 3.2 कोटी
- चौथा दिवस : 1 कोटी
- पाचवा दिवस : 1.45 कोटी
- सहावा दिवस : 1.8 कोटी
- सातवा दिवस : 1.6 कोटी
- आठवा दिवस : 12.4 कोटी
- नववा दिवस : 5.4 कोटी
- दहावा दिवस : 6.6 कोटी
- अकरा दिवस : 2.50 कोटी
'बाईपण भारी देवा'चं हटके प्रमोशन अन् माउथ पब्लिसिटी
'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमातील सर्व अभिनेत्री या सिनेमाचं जोरदार प्रमोशन (Pramotion) करत आहेत. महिलावर्ग मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला जात आहे. सिनेमा पाहायला गेल्यावर त्या सिनेमातील गाण्यांवर रिल्स बनवत आहेत. खास नऊवारी साडी आणि डोळ्यावर काळा चष्मा लाऊन त्या सिनेमा पाहताना दिसून येत आहेत.
'त्या' सहाजणी बॉलिवूडला भिडल्या
एका पेक्षा एक सिनेमे घेऊन येणाऱ्या केंदार शिंदेंनी (Kedar Shinde) 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. या सहाजणी बॉलिवूडलाही भिडल्याचं दिसत आहे.
'बाईपण भारी देवा'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. '72 हुरें' या सिनेमाने आतापर्यंत 1.26 कोटींची कमाई केली आहे. तर विद्या बालनच्या 'नीयत' (Neeyat) या सिनेमाने 4.16 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडलाही या सिनेमाने चांगलीच गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या