Anushka Sharma Virat Kohli : लंडनमधील गल्ल्यांमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा रोमँटिक अंदाज; व्हिडीओ व्हायरल
Anushka Sharma Virat Kohli London Trip : अनुष्का शर्माने सोशल मीडियावर लंडन ट्रिपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Anushka Sharma Virat Kohli London Trip Video : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सिनेमांसह सोशल मीडियावरदेखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. अनुष्का कधी विराट कोहलीसोबतचे (Virat Kohli) तर कधी लेक वामिकासोबत खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर लंडन ट्रिपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अनुष्का शर्मा तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अनुष्काचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाला की चाहते त्याचं कौतुक करतात. तर दुसरीकडे मात्र नेटकरी तिला ट्रोल करतात. अशातच अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अनुष्का शर्मा कुटुंबीयांसमवेत लंडनमध्ये...
अनुष्काच्या नव्या व्हिडीओमध्ये ती कुटुंबीयांसमवेत म्हणजेच पती विराट कोहली आणि लेक वामिकासोबत दिसत आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमधील गल्ल्यांमध्ये मस्ती करताना दिसले आहेत. त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का कॉफी पिताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"लंडन शहर आणि कॉफी वॉकची आठवण येत आहे".
अनुष्काच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव (Anushka Sharma Video Viral)
अनुष्काचा नवा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे नेटकरी मात्र तिला चांगलच ट्रोल करत आहे. यांच्याकडे सर्वात महागडा कॅमेरामॅन आहे, अनुष्का शर्मामुळे किंग विराट कोहली पूर्णपणे बदलला, विरुष्का, वहिनी बाई, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अनुष्काच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Anushka Sharma Upcoming Project)
अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टवर खूप मेहनत घेत आहे. भारतीय क्रिकेटर झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांच्या बायोपिकमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'चकदा एक्सप्रेम' (Chakda 'Xpress) असं या सिनेमाचं नाव आहे. भारतीय क्रिकेट टीमचा पुढील सामना 12 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याआधी अनुष्का आणि विराट लंडन ट्रिपला गेले आहेत. विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी अनुष्कासह लंडनमध्ये किर्तन ऐकण्यासाठी गेला होता. कृष्ण दास यांच्या किर्तनादरम्यानचे अनुष्का आणि विराटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
संबंधित बातम्या