Entertainment News Live Updates 23 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Selfiee OTT Release : खिलाडी कुमारचा 'सेल्फी' आता घरबसल्या पाहा; जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर झाला रिलीज...
Akshay Kumar Selfiee OTT Release : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांचा 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा 'सेल्फी' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 'सेल्फी'ला ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी'साठी शिव ठाकरेने घेतलं तगडं मानधन
Shiv Thakare Khatron Ke Khiladi Fees : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा कार्यक्रम सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होणार असल्याने या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी शिव ठाकरेने तगडं मानधन घेतलं आहे. 'खतरों के खिलाडी 13'च्या स्पर्धकांमधील शिव ठाकरे सर्वात महागडा स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेची लोकप्रिय लक्षात घेत 'खतरों के खिलाडी'च्या निर्मात्यांनी त्याला चांगलच मानधन दिलं आहे. एका एपिसोडसाठी त्याने 5-8 लाख रुपये घेतले आहेत".
शाहरुखच्या 'पठाण' पुढे फिका पडला सलमानचा 'किसी का भाई किसी की जान'
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे.
Santosh Juvekar : 'रावरंभा' सिनेमात संतोष जुवेकरची वर्णी
Santosh Juvekar Movie Ravrambha : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरच्या (Santosh Juvekar) रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता पहिल्यांदाच एका ऐतिहासिक सिनेमात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी 'रावरंभा' (Ravrambha) सिनेमात 'जालिंदर' या भूमिकेत तो दिसणार आहे.
View this post on Instagram
Ranbir Kapoor Trolled : आलिया भट्टची चप्पल उचलणं रणबीरला पडलं महागात
Ranbir Kapoor And Alia Bhatt Video Viral : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलियाने दारात चप्पल काढलेली दिसत आहे. तिने दारात चप्पल काढल्यामुळे रणबीर तिची चप्पल उचलतो आणि आतल्याबाजूला ठेवतो. या व्हिडीओमुळे अनेकांनी रणबीरला ट्रोल केलं आहे. तर काही मंडळींनी मात्र अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
Salman Khan : सलमान खानसाठी यंदाची ईद खास? जाणून घ्या 'किसी का भाई किसी की जान'चं दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : फरहाद सामजी (Farhad Samji) दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 15.81 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 25 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. ईदची सुट्टी असल्याने सलमानच्या चाहत्यांची पाऊले 'किसी का भाई किसी की जान' पाहण्यासाठी सिनेमागृहाकडे वळाल्याचं दिसून आलं आहे.
View this post on Instagram
Manasi Naik : मानसी नाईकची स्वप्नपूर्ती! आनंदात केला नव्या घरात गृहप्रवेश
Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. अशातच आता अभिनेत्रीचं स्वप्न साकार झालं आहे. मानसीने आता नवं घर घेतलं आहे. या नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
Onkar Bhojane : ओंकार भोजने 'कोकण हार्टेड गर्ल'चा मोठा चाहता
Onkar Bhojane : इंडस्ट्रीतली आवडती क्रश कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना ओंकार म्हणाला,"क्रश नाही. पण मला 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आवडते. मी तिला फॉलो करतो. तिचा स्वभाव मला आवडतो. ती ज्याप्रकारे एखादा सामाजिक मुद्दा उचलून धरते त्याविषयी भाष्य करते ते मला आवडतं. मी तिचा एक चाहता आहे".