Entertainment News Live Updates 18 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2022 05:22 PM
Vineet Kumar Singh : रंगबाज 3 साठी विनीत कुमार सिंहचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

Vineet Kumar Singh : अभिनेता विनीत कुमार सिंहने (Vineet Kumar Singh) मनोरंजन क्षेत्रात आपली अष्टपैलुत्व अनेकदा सिद्ध केली आहे. 'मुक्काबाज'मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडली. यात बेतालचा लष्करी अधिकारी आणि गुंजन सक्सेनाच्या लष्करी दलातील पायलट भूमिकेचाही समावेश आहे. आता तो आणखी एका दमदार व्यक्तिरेखेसह लोकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.


वाचा सविस्तर बातमी

21 वर्षाच्या मॉडेलनं संपवलं आयुष्य; राहत्या घरात आढळला मृतदेह

Kolkata Model Puja Sarkar Suicide : कोलकाता  (Kolkata) चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री यांच्या आत्महत्येंच्या प्रकरणांमुळे खळबळ माजली आहे.  मे महिन्यामध्ये जवळपास चार अभिनेत्रींनी आत्महत्या केली. या अभिनेत्रींच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे? तसेच बंगाली चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या वाढत का आहे? असे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. आता दक्षिण कोलकाता (Kolkata) येथील बांसद्रोणी भागामध्ये राहणाऱ्या पूजा सरकार (Puja Sarkar) नावाच्या मॉडेलनं आत्महत्या केली आहे. 

Hit-The First Case : बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'हिट'ची जादू; पहिल्या वीकेंडमध्ये केली कोट्यवधींची कमाई

Hit-The First Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  राजकुमार रावचा (Rajkummar Rao)  हिट-द फर्स्ट (Hit-The First Case) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये कोट्यवधींची कमाई केलेली आहे. तरण आदर्शनं या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईबाबत सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी

Hit-The First Case : बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'हिट'ची जादू; पहिल्या वीकेंडमध्ये केली कोट्यवधींची कमाई

Hit-The First Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  राजकुमार रावचा (Rajkummar Rao)  हिट-द फर्स्ट (Hit-The First Case) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये कोट्यवधींची कमाई केलेली आहे. तरण आदर्शनं या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडच्या कमाईबाबत सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी

Mere Desh Ki Dharti : ओटीटीवर पाहा 'मेरे देश की धरती' चित्रपट; दिव्येंदु शर्माची प्रमुख भूमिका

Mere Desh Ki Dharti : सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. ओटीटीवरील चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते.  चित्रपटांच्या या रंजक प्रवासात प्रेक्षकांची आणि समीक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवणारा दिव्येंदु शर्माचा (Divyendu Sharma) ‘मेरे देश की धरती’ (Mere Desh Ki Dharti) हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या अॅमेझॅान प्राइम व्हिडिओवर पहाता येणार आहे. वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता या चित्रपटाचा आस्वाद ‘अॅमेझॉन प्राइम’ (Amazon Prime) वर घेता येईल. नुकताच हा चित्रपट अॅमेझॅान प्राइम व्हिडिओवर’ आला आहे. ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वरुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने प्रेक्षकांकडून आनंद व्यक्त होत आहे.


वाचा सविस्तर बातमी 

रणबीर-आलियाकडे एक नव्हे, दोन चिमुकले पाहुणे येणार?

Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे. नुकतीच या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र आता रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणबीरने दिलेल्या एका उत्तरामुळे आता त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधू लागले आहेत. 


वाचा संपूर्ण बातमी

'खुशीने बॉलिवूड पदार्पणासाठी खूप मेहनत केली'; ट्रोल करणाऱ्यांना जान्हवी कपूरचं उत्तर

Janhvi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री   जान्हवी कपूरचा  (Janhvi Kapoor)  'गुडलक जेरी' (Goodluck Jerry) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता.  जान्हवीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. जान्हवी सध्या तिच्या  'बवाल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेक वेळा जान्हवी कपूरला स्टारकिड असल्यानं ट्रोल केलं जातं. आता जान्हवीची बहिण खुशी कपूर (Khushi Kapoor) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. खुशी ही द आर्चीज (The Archies) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच खुशीला अनेक लोक ट्रोल करत आहेत. ती स्टारकिड असल्यानं तिला काम लवकर आणि सहज मिळालं असेल असं अनेकांचे मत आहे. आता या ट्रोलर्सला जान्हवीनं उत्तर दिलं आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत विशाखा सुभेदारची एण्ट्री होणार!

Thipkyanchi Rangoli : स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा आणि शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ‘दमयंती दुधखुळे’ असं या पात्राचं नाव असून, ती एक विवाह सल्लागार असणार आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार दमयंती दुधखुळे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

महेश टिळेकर यांनी घेतली दिग्गज मल्याळम कलाकारांशी भेट!

Mahesh Tilekar : सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांची साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांशी चांगली मैत्री आहे. त्यांनी साऊथ अभिनेत्री निमिषा सजयन (Nimisha Sajayan) हिला मराठी चित्रपटात ब्रेक दिला आहे. आता त्यांनी काही साऊथ कलाकारांची भेट घेतली आहे. नुकतेच त्यांनी केरळमध्ये जाऊन मल्याळम सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या काही कलाकारांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

विकी कौशलनं शेअर केला कतरिनासोबतचा रोमँटिक फोटो

गर्लफ्रेंडला सोडून राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत थाटला संसार; मुमताज यांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

Rajesh Khanna : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी ओळख असणारे अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna)यांचा आज स्मृतीदिन. राजेश खन्ना हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत होते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा होता. राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना असे आहे. त्यांनी 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आखिरी खत' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले.  राजेश खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांच्यासोबत काम केलं. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. लग्नानंतर मुमताज अमेरिकेला गेल्या. त्यानंतर त्यांच्या आठवणीने राजेश खन्ना भावूक झाले होते. राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्यासोबत लग्न केल्यावर मुमताज यांची पहिली प्रतिक्रिया कशी होती हे जाणून घेऊयात....


वाचा सविस्तर बातमी

लग्नबंधनात अडकले जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक!

Jennifer Lopez, Ben Affleck : हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री-गायिक जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि अभिनेता बेन अफ्लेक (Ben Affleck) यांनी आता लग्नगाठ बांधली आहे. सध्या या दोघांची जोडी चर्चेत आहेत. जेनिफर आणि बेन जवळपास मागील 20 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांनीही त्यांच्या नात्याला नवीन नाव दिलं आहे. या दोघांनी लास वेगासमध्ये लग्न केले. दोघांनी यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणाही केली होती. या दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. चाहते या दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.


वाचा संपूर्ण बातमी

आर माधवनच्या लेकाची पुन्हा यशस्वी भरारी, स्विमिंगमध्ये मोडला नॅशनल रेकॉर्ड!

R Madhavan : अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे खूप आनंदी आहे. दरम्यान, त्याच्या आनंदात आता आणखी भर पडली आहे. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याने स्विमिंगमध्ये नॅशनल रेकॉर्ड मोडला आहे. स्विमिंगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित करत त्याने आपल्या देशाचे आणि वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. अभिनेत्याने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

अमोल कोल्हेंनी शेअर केला 'शिवप्रताप - गरुडझेप' चित्रपटाचा टीझर

Shivpratap Garudzep : अभिनेते अमोल कोल्हें (Amol Kolhe) यांचा 'शिवप्रताप - गरुडझेप' (Shivpratap Garudzep) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 



करीना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

Kareena Kapoor :  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही सध्या तिच्या कुटुंबासोबत लंडन ट्रिप एन्जोय करत आहे. करीना ही पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि  तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली आहे. करीना सोशल मीडियावर लंडन ट्रिपचे फोटो शेअर करत आहे. करीना आणि सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे आता करीना ही तिसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


वाचा सविस्तर बातमी

Ranbir Alia Kesariya Song Troll: 'ब्रह्मास्त्र'मधील 'केसरिया' गाणं रिलीज होताच झालं ट्रोल; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस!

Ranbir Alia Kesariya Song Troll : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra)  हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) या गाण्याचा टिझर रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या आधी रिलीज करण्यात आला. काल (17 जुलै) केसरिया हे संपूर्ण गाणं रिलीज झाला. या गाण्याला काही लोकांची पसंती मिळाली तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. काही मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर करुन काही नेटकऱ्यांनी या गाण्याला ट्रोल केलं आहे.  


वाचा सविस्तर बातमी 

आलिया भट्टशी लग्न करण्यापूर्वीच झाली होती ‘ज्युनिअर कपूर’ची प्लॅनिंग! रणबीर कपूरने केला उलगडा...

Ranbir Kapoor, Alia Bhatt : सध्या बॉलिवूडची लोकप्रिय स्टार जोडी अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रचंड चर्चेत आहेत. या जोडीचा बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपट देखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. इतकचं नाही तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. बाळाच्या आगमनाच्या आनंदामुळे ते आणखीन चर्चेत आले आहेत. लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यांतच त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री! वाचा प्रियांका चोप्रबाद्द्ल...

Priyanka Chopra Birthday : बॉलिवूडची लाडकी ‘देसी गर्ल’ आज 40 वर्षांची झाली आहे. आज (18 जुलै) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. बरेलीतून बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार बनली आहे. एका छोट्या गावातून आलेल्या या मुलीने स्वतःसाठी मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान तयार केले आहे. या दरम्यान तिला देखील प्रचंड संघर्ष करावा लागला होता.


वाचा संपूर्ण बातमी

Rakhi Sawant Net Worth : राखी सावंतची लग्झरी लाइफ, 37 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे राखी

Rakhi Sawant Net Worth: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या बंगळुरूमधील बिझनेसमन आदिल दुर्राणीला डेट करत आहे. या नव्या रिलेशनशिपमुळे राखी सावंत प्रचंड चर्चेत आली आहे. राखीने नावासोबत संपत्ती देखील कमवली आहे. राखीने मेहनतीने संपत्ती कमावली आहे. सध्याच्या घडीला राखी ही कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी सावंतची नेटवर्थ जवळपास 37 कोटी आहे. राखीने ही संपत्ती स्टेज शो, रिआल्टी शो आणि जाहिरातीतून कमावली आहे. सध्या मुंबईत राखी सावंतचे दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बंगल्याची किंमत 11 कोटी आहे. हा बंगला कोणत्या लग्जरी हॉटेलपेक्षा कमी नाही. याबरोबरच राखीला महागड्या कारची देखील आवड आहे. 


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Mirzapur 3 : 'मिर्झापूर 3'च्या शूटिंगला पुढच्या महिन्यापासून होणार सुरुवात


Mirzapur 3 Shooting Date : लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या (Mirzapur-3)तिसऱ्या सीझनची नवी माहिती समोर आली आहे. मिर्झापूर सीझन 3 चे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिर्झापूर सीरिजचा तिसरा सीझन आणखी दमदार असणार आहे. या सीझनमध्येही कालिन भैया आणि गुड्डू भैय्या आपली अभिनयाची जादू दाखवतील यात शंका नाही.  'मिर्झापूर 3'मध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अली फजल (Ali Fazal) आणि श्वेता त्रिपाठी (Shewta Tripathi) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या स्थानिक ऑडिशन्स उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये पूर्ण झाल्या आहेत.


शनिवारी लखनौमध्ये मिर्झापूर 3 च्या स्थानिक कलाकारांच्या ऑडिशन्स पूर्ण झाल्या. ऑगस्टच्या अखेरीस लखनौ चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. मिर्झापूर 3 च्या ऑडिशन्स 15 आणि 16 जुलै रोजी गोमतीनगरमध्ये घेण्यात आल्या.


अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या सीनचे चित्रीकरण लखनौमध्ये होणार आहे. यासाठी जुन्या लखनौमधील चौक, इमामबारा, रूमी दरवाजा, काकोरी, मलिहाबादसह आसपासची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. वेब सिरीजचे शेड्युल जवळपास एक महिन्याचे असून, त्यात स्थानिक कलाकारांची निवड करण्यात आली आहे.


‘मिर्झापूर 3’चे लोकल लाईन प्रोड्युसर रती शंकर त्रिपाठी आहेत. 'मिर्झापूर 2' चा काही भाग लखनौमध्ये शूट करण्यात आला होता. 'मिर्झापूर 3'चे शूटिंग सुरू झाले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.