(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Janhvi Kapoor : 'खुशीने बॉलिवूड पदार्पणासाठी खूप मेहनत केली'; ट्रोल करणाऱ्यांना जान्हवी कपूरचं उत्तर
चित्रपट रिलीज होण्याआधीच खुशीला (Khushi Kapoor) अनेक लोक ट्रोल करत आहेत.आता या ट्रोलर्सला जान्हवीनं (Janhvi Kapoor) उत्तर दिलं आहे.
Janhvi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) 'गुडलक जेरी' (Goodluck Jerry) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. जान्हवीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. जान्हवी सध्या तिच्या 'बवाल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेक वेळा जान्हवी कपूरला स्टारकिड असल्यानं ट्रोल केलं जातं. आता जान्हवीची बहिण खुशी कपूर (Khushi Kapoor) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. खुशी ही द आर्चीज (The Archies) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच खुशीला अनेक लोक ट्रोल करत आहेत. ती स्टारकिड असल्यानं तिला काम लवकर आणि सहज मिळालं असेल असं अनेकांचे मत आहे. आता या ट्रोलर्सला जान्हवीनं उत्तर दिलं आहे.
खुशीच्या स्ट्रगलबाबत जान्हवी म्हणते...
एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं खुशीच्या स्ट्रगलबाबत सांगितलं,''द आर्चीज' या चित्रपटात काम मिळवण्यासाठी खुशी आणि सुहाना यांना मेहतन करावी लागली. तिनं दोन-तीन वेळा ऑडिशन्स दिल्या. तसेच तिनं काही वर्कशॉप्स देखील केले. मला आठवत नाही मी खुशीसोबत जास्त वेळ कधी घालवला. कारण ती सकाळी 4-5 वाजता निघून जाते.'
जोया अख्तर 'द आर्चीज' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'द आर्चीज' चित्रपटाच्या पडद्यावर प्रदर्शित होईल, असे सर्वांना वाटत होते. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानने यासंदर्भात सोशल मीडियावर खुलासा केला आहे. 'द आर्चीज' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरसोबतच दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांनी केली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.
हेही वाचा: