(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vineet Kumar Singh : रंगबाज 3 साठी विनीत कुमार सिंहचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; दहा किलो वजन वाढवले
रंगबाज 3: डर की पॉलिटिक्सचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
Vineet Kumar Singh : अभिनेता विनीत कुमार सिंहने (Vineet Kumar Singh) मनोरंजन क्षेत्रात आपली अष्टपैलुत्व अनेकदा सिद्ध केली आहे. 'मुक्काबाज'मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडली. यात बेतालचा लष्करी अधिकारी आणि गुंजन सक्सेनाच्या लष्करी दलातील पायलट भूमिकेचाही समावेश आहे. आता तो आणखी एका दमदार व्यक्तिरेखेसह लोकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.
अलीकडेच विनीत कुमार सिंहचा आगामी शो रंगबाज 3: डर की पॉलिटिक्सचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. विनीत या मालिकेत हारून शाह अली बेगची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने शरीराचे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आणि अवघ्या काही दिवसांतच त्याचे वजन 10 किलोपर्यंत वाढले. अनेकांना माहीत आहे की, मुक्काबाजसाठी त्याने स्वत:ला बॉक्सर बनवले आणि त्यासाठी त्याने पंजाबमधील बॉक्सरसोबत एक वर्ष कठोर प्रशिक्षण घेतले. आता पुन्हा एकदा त्याने रंगबाज 3 साठी स्वतःला पूर्णपणे बदलले आहे जे त्याच्यासाठी खूप कठीण होते. अलीकडे अभिनेता यावर खुलेपणाने बोलताना दिसत आहे.
तो म्हणतो, 'या भूमिकेसाठी दहा किलो वजन वाढवणे खूप अवघड होते, मी साकारत असलेली भूमिका पाहणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. या पात्रासाठी मला कठोर आहार आणि कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. पण हा एक अद्भुत प्रवास आहे आणि मी मालिका प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. हे एक गडद, गुंतागुंतीचे परंतु भावपूर्ण पात्र आहे आणि मला ते खेळण्याचा खूप आनंद झाला.'
विनीत कुमार सिंग या वर्षी आणखी अनेक मनोरंजक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे ज्यात सिया, आधार, दिल है ग्रे यांचा समावेश आहे.
हेही वाचा: