Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी यांना आज कोण ओळखत नाही? जया किशोरी अशा कथाकार आहेत, ज्यांना सर्व वयोगटातील लोक आवडतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजया किशोरी यांनी खास शैलीत भजन गाऊन आणि कथा कथन करून लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली.
जया किशोरी यांची कीर्ती देश-विदेशात पसरली आहे. तुम्ही मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांचे नाव देखील ऐकले असेल किंवा सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील.
जाणून घेऊया, जया किशोरी यांच्या जीवनाशी निगडीत रहस्ये आणि त्यांच्या चरित्राबद्दल. जया किशोरी यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी राजस्थानमधील सुजानगढ या एका लहानशा गावात झाला.
जया किशोरीच्या वडिलांचे नाव राधे श्याम हरितपाल आणि आईचे नाव गीता देवी हरितपाल आहे. जया किशोरीला चेतना शर्मा नावाची बहीण आहे.
जया किशोरींचे अजून लग्न झालेले नाही. जया किशोरीच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर त्यांनी बी.कॉम.चे शिक्षण घेतले आहे. यासोबतच त्यांना अध्यात्माचे ज्ञानही मिळाले आहे.
जया किशोरी यांना त्यांच्या कुटुंबातूनच आध्यात्मिक वातावरण मिळू लागले. जया किशोरी 6-7 वर्षांच्या असताना त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला.
वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी जया किशोरी यांनी लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्रम्, मधुराष्टकम्रा, शिवपंचाक्षर स्तोत्रम्, दरिद्रय दहन शिव स्तोत्रम् यांसारखी अनेक स्तोत्रे आठवली आणि भजन आणि गीते गायला सुरुवात केली.
जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा आहे. जया किशोरी यांच्या गुरूचे नाव गोविंद राम मिश्रा आहे. जया शर्मा यांना 'किशोरी' ही पदवी गुरुजींकडूनच मिळाली.
श्री कृष्णावरील गाढ श्रद्धा आणि प्रेमामुळे तिला किशोरी ही पदवी देण्यात आली आणि त्यानंतर त्या जया किशोरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
मात्र, जया किशोरी स्वत:ला एक सामान्य मुलगी मानतात आणि त्यांना संत म्हणणे आवडत नाही. दोन लाखांची लेदर बॅग विमानतळावर त्यांच्या हाती दिसून आल्याने त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.