Thipkyanchi Rangoli : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत विशाखा सुभेदारची एन्ट्री होणार! अप्पू-शशांक आता तरी एकत्र येणार?
Thipkyanchi Rangoli : अवंतिकाच्या येण्याने कानिटकरांच्या घरात एक मोठं वादळ आलं आहे. यामुळेच अप्पू आणि शशांकच्या नात्यात देखील दुरावा निर्माण झाला आहे.

Thipkyanchi Rangoli : स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा आणि शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ‘दमयंती दुधखुळे’ असं या पात्राचं नाव असून, ती एक विवाह सल्लागार असणार आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार दमयंती दुधखुळे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील अपूर्वा आणि शशांक यांची ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. दोघांच्या नात्यामधील खट्याळपणा, अपूर्वाचे घरातील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न हे तिच्या पात्राचे गुण प्रेक्षकांना भावले आहेत.
विशाखा सुभेदार साकारणार ‘हे’ पात्र
‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील या भूमिकेविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाल्या की, ‘मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक छोटासा ठिपका असणार आहे, जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे. दमयंती दुधखुळे नावावरुनच ही व्यक्तिरेखा विनोदी असेल याचा अंदाज येतो. नावाप्रमाणेच ही एका अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. अप्पू-शशांकला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ती तिच्या आयुष्यातील गुंताही सोडवते. त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल.’
वीणा जगतापचीही एन्ट्री!
कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. नुकतीच या मालिकेत अभिनेत्री वीणा जगतापची एन्ट्री झाली आहे. वीणा या मालिकेत ‘अवंतिका कानेटकर चौधरी’ ही व्यक्तिरेखा सकारात आहे. अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी असून, प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं होतं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल झाली आहे. अवंतिकाच्या येण्याने कानिटकरांच्या घरात देखील एक मोठं वादळ आलं आहे. यामुळेच अप्पू आणि शशांकच्या नात्यात देखील दुरावा निर्माण झाला आहे.
या मालिकेतील अपूर्वा वर्तक आणि शशांक कानिटकर ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) अपूर्वा वर्तकचे पात्र साकारत आहे. तर, शशांक कानिटरचे पात्र चेतन वडनेरे (Chetan Vadnere) साकारत आहे.
हेही वाचा:
- Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत अप्पू स्वीकारेल का शशांकचं प्रेम?
- Thipkyanchi Rangoli : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री वीणा जगतापची होणार एन्ट्री
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
महत्त्वाच्या बातम्या





















