![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rakhi Sawant Net Worth : राखी सावंतची लग्झरी लाइफ, 37 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे राखी
Rakhi Sawant Net Worth: कॉन्ट्रव्हर्सी क्वीन राखी सावंत नेहमी काहीतरी निमित्ताने माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरते. राखी सावंत आणि कॉन्ट्रव्हर्सीचे कनेक्शन खूप जुने आहे.
![Rakhi Sawant Net Worth : राखी सावंतची लग्झरी लाइफ, 37 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे राखी Rakhi Sawant Net Worth Rakhi Sawant's luxury life, Rakhi is the owner of 37 crores of wealth Rakhi Sawant Net Worth : राखी सावंतची लग्झरी लाइफ, 37 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे राखी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/cd205b8292302186470e826aaef527f9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rakhi Sawant Net Worth: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या बंगळुरूमधील बिझनेसमन आदिल दुर्राणीला डेट करत आहे. या नव्या रिलेशनशिपमुळे राखी सावंत प्रचंड चर्चेत आली आहे. राखीने नावासोबत संपत्ती देखील कमवली आहे. राखीने मेहनतीने संपत्ती कमावली आहे. सध्याच्या घडीला राखी ही कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.
राखी सावंतची नेटवर्थ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी सावंतची नेटवर्थ जवळपास 37 कोटी आहे. राखीने ही संपत्ती स्टेज शो, रिआल्टी शो आणि जाहिरातीतून कमावली आहे. सध्या मुंबईत राखी सावंतचे दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बंगल्याची किंमत 11 कोटी आहे. हा बंगला कोणत्या लग्जरी हॉटेलपेक्षा कमी नाही. याबरोबरच राखीला महागड्या कारची देखील आवड आहे.
राखी ही सध्या आदिल दुर्रानीला डेट करत आहे
राखी ही सध्या आदिल दुर्रानीला डेट करत आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बिग बॉस या शोमुळे राखीला लोकप्रियता मिळाली. राखी तिच्या विनोदी वक्यव्यामुळे चर्चेत असते. आदिल दुर्राणी याने राखीला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. आदिल राखीसोबत मुंबईत डान्स अकादमी उघडण्याचा विचार करत आहे.
कॉन्ट्रव्हर्सी क्वीन
आयटम गर्ल म्हणून करियरची सुरुवात केलेली ही अभिनेत्री कधी आपल्या फॅशनेबल कपड्यांनी तर कधी वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांनी लोकांच्या कायम लक्षात राहते. कॉन्ट्रव्हर्सी क्वीन राखी सावंत नेहमी काहीतरी निमित्ताने माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरते. राखी सावंत आणि कॉन्ट्रव्हर्सीचे कनेक्शन खूप जुने आहे.
संबंधित बातम्या :
Rakhi Sawant Home Tour Video : राखी सावंतचा आलिशान महाल! ‘ड्रामा क्वीन’चं दुबई स्थित घर पाहिलंत का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)