Mahesh Tilekar : साऊथच्या अभिनेत्रीला दिला मराठी चित्रपटात ब्रेक, आता महेश टिळेकर यांनी घेतली दिग्गज मल्याळम कलाकारांशी भेट!
Mahesh Tilekar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांची साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांशी चांगली मैत्री आहे.
Mahesh Tilekar : सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांची साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांशी चांगली मैत्री आहे. त्यांनी साऊथ अभिनेत्री निमिषा सजयन (Nimisha Sajayan) हिला मराठी चित्रपटात ब्रेक दिला आहे. आता त्यांनी काही साऊथ कलाकारांची भेट घेतली आहे. नुकतेच त्यांनी केरळमध्ये जाऊन मल्याळम सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या काही कलाकारांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत.
‘या’ कलाकारांची घेतली भेट
छोट्या दुकानात टेलरिंग काम करून पुढे मल्याळम सिनेमांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत अभिनयाला सुरुवात केलेले लोकप्रिय जेष्ठ कलाकार इंद्रन, तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमातून मिमिक्री, निवेदन करून मग मल्याळम सिनेमांतून कधी विनोदी तर, कधी गंभीर भूमिकांमधून प्रसिद्ध असलेले अभिनेते सूरज, ज्यांना एक नॅशनल अवॉर्ड आणि केरळ सरकारचे 20 उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाले आहेत, त्यांची भेट महेश टिळेकर यांनी घेऊन चित्रपटसृष्टीतील कामाबाबत चर्चा केली.
यावेळी ‘जय भीम’ या बहुचर्चित चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मल्याळम अभिनेत्री लिजोमोल जोस हिच्याशी पण महेश टिळेकर यांनी संवाद साधला.
‘हवाहवाई’मधून निमिषाची मराठीत एन्ट्री
महेश टिळेकर यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘हवाहवाई’ या चित्रपटात ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम सिनेमातून समर्थ अभिनयाचं दर्शन घडवणारी अभिनेत्री नीमिषा सजयन ही मराठीत प्रथमच पदार्पण करत आहे. ‘हवाहवाई’ या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्यानं निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं, असं महेश टिळेकर यांनी सांगितलं. साऊथचे चित्रपट इतर भाषेत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत असताना, साऊथ मधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून सुरू केला आहे. निमिषा सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका असून, अनेक नवीन कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा :
वयाच्या 88व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं 'हवाहवाई' चित्रपटासाठी गाणं!