एक्स्प्लोर

Jennifer Lopez : आधी ब्रेकअप, मग 20 वर्ष डेटिंग! आता लग्नबंधनात अडकले जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक!

Jennifer Lopez, Ben Affleck : हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री-गायिक जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि अभिनेता बेन अफ्लेक (Ben Affleck) यांनी आता लग्नगाठ बांधली आहे.

Jennifer Lopez, Ben Affleck : हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री-गायिक जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि अभिनेता बेन अफ्लेक (Ben Affleck) यांनी आता लग्नगाठ बांधली आहे. सध्या या दोघांची जोडी चर्चेत आहेत. जेनिफर आणि बेन जवळपास मागील 20 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांनीही त्यांच्या नात्याला नवीन नाव दिलं आहे. या दोघांनी लास वेगासमध्ये लग्न केले. दोघांनी यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणाही केली होती. या दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. चाहते या दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.

जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक या दोघांचे अफेअर 2000पासून चर्चेत होते. 2002 मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली होती. पण त्याच वर्षी दोघांचे ब्रेकअपही झाले होते. यानंतर दोघांनी वेगवेगळ्या जोडीदारांसोबत लग्न केले होते. त्यांना मुलं देखील आहेत. मात्र, काही काळानंतर ते पुन्हा एकत्र आले होते आणि त्यांनी लग्न केले.

20 वर्षांनी बांधली लग्नगाठ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बॅटमॅन’ फेम अभिनेता बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ यांना शनिवार, 16 जुलै रोजी एकमेकांशी लग्न केले आहे. इतकेच नाही तर, जेनिफरच्या ब्रायडल लूकचे काही फोटोही समोर आले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेनिफरचा जवळचा मित्र हेअरस्टायलिस्ट क्रिस अॅपलटाउनने तिच्या ब्रायडल लूकचा एक छोटासा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडिओमध्ये जेनिफरने पांढऱ्या रंगाचा साधा वेडिंग गाऊन परिधान केलेला दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ शेअर करत ख्रिस अॅपलटाउनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लग्नापूर्वीच्या शेवटच्या क्षणातील भावना…’. हॉलिवूडचे हे लाडके जोडपे लवकरच त्यांच्या अधिकृत विवाह सोहळ्यासाठी लास वेगासला परतणार आहे.

जेनिफर आणि बेन यांनी एका निवेदन जारी करत त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्यात जेनिफरने लिहिले की, 'प्रेम सुंदर आहे, प्रेम दयाळू आहे. म्हणूनच प्रेम देखील सहनशील आहे. 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता एकत्र आलो आहोत.’

हेही वाचा :

R Madhavan : आर माधवनच्या लेकाची पुन्हा यशस्वी भरारी, स्विमिंगमध्ये मोडला नॅशनल रेकॉर्ड!

Entertainment News Live Updates 18 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
Embed widget