Ranbir Alia : रणबीर-आलियाकडे एक नव्हे, दोन चिमुकले पाहुणे येणार? अभिनेत्याच्या उत्तराने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
Ranbir Kapoor, Alia Bhatt : रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे. नुकतीच या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र आता रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणबीरने दिलेल्या एका उत्तरामुळे आता त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधू लागले आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान तो अनेकदा माध्यमांना मुलाखती देत आहे. यातील एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याला एक तस्क देण्यात आला. या टास्कमध्ये त्याला सगळ्या चुकीच्या गोष्टी बोलायच्या होत्या. या टास्कमध्ये रणबीर म्हणाला की, ‘माझ्या घरी जुळ्या बाळांचं आगमन होणार आहे. मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे. आणि मी लवकरच या सगळ्यातून मोठा ब्रेक घेणार आहे.’
चर्चांना सुरुवात!
रणबीर कपूरने त्याला दिलेला टास्क तर पूर्ण केला. पण यात त्याने दिलेल्या उत्तराने आता चाहते गोंधळात पडले आहे. या टास्कच्या नियमानुसार रणबीरला खोटं बोलायचं होतं. मात्र, रणबीरने थेट बाळांचा उल्लेख केल्याने आता त्याने याचे संकेत दिले असावेत, असा अंदाज चाहते बांधत आहेत. तसेच, रणबीरचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ हा पौराणिक कथेवर आधारित असलेलाच चित्रपट आहे. तर, बाळाच्या जन्मानंतर कदाचित रणबीर कपूर कामातून ब्रेक घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यास रणबीरने खरं-खोटं हा खेळ न खेळता भविष्यातील काही गोष्टींचे संकेत दिले असावेत, अशी अटकळ बांधली जात आहे.
लवकरच चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीरच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हे कलाकार देखील ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये प्रमूख भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या