एक्स्प्लोर

Happy Birthday Priyanka Chopra : बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री! वाचा प्रियांका चोप्रबाद्द्ल...

Priyanka Chopra Birthday : बॉलिवूडची लाडकी ‘देसी गर्ल’ आज 40 वर्षांची झाली आहे. आज (18 जुलै) प्रियांका चोप्रा तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत

Priyanka Chopra Birthday : बॉलिवूडची लाडकी ‘देसी गर्ल’ आज 40 वर्षांची झाली आहे. आज (18 जुलै) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. बरेलीतून बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार बनली आहे. एका छोट्या गावातून आलेल्या या मुलीने स्वतःसाठी मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान तयार केले आहे. या दरम्यान तिला देखील प्रचंड संघर्ष करावा लागला होता.

प्रियांका चोप्राचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे बालपण जमशेदपूरमध्ये गेले. मनोरंजन विश्वात प्रियांका चोप्राने अतिशय मेहनतीने हे स्थान मिळवले आहे. यामागचा तिचा प्रवास खूप रंजक होता. प्रियांकाचे वडील आर्मी ऑफिसर होते, त्यामुळे तिला अनेकदा शाळा बदलावी लागल होती. जमशेदपूरपूर्वी प्रियांका चोप्राचे बालपण बरेलीमध्ये गेले. वयाच्या 13व्या वर्षी प्रियांका अमेरिकेला गेली आणि तिथे ती तिच्या मावशीकडे राहू लागली. प्रियांकाने अमेरिकेत जवळपास तीन वर्षे घालवली आणि ती पुन्हा भारतात परत आली.

...करिअर म्हणून निवडले अभिनय क्षेत्र!

प्रियांका चोप्रा अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली, जेव्हा तिने 2000 मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला. प्रियांकाला करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडायचे नव्हते. तिला इंजिनियर व्हायचे होते किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करायचा होता. पण, 2000 साली ‘मिस वर्ल्ड’ बनल्यानंतर प्रियांकाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार सुरू केला. 2002मध्ये प्रियांका 'हमराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण, तिच्या जागी अमिषा पटेलला कास्ट करण्यात आले. तिने 2003 मध्ये सनी देओलसोबत 'द हीरो' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याआधी प्रियांकाने वर्षभरापूर्वी 'थामिजान' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

यानंतर प्रियंका चोप्रा अक्षय कुमार आणि लारा दत्तासोबत 'अंदाज' चित्रपटात दिसली. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना तितकासा आवडला नाही. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही. यानंत 'ऐतराज' हा चित्रपट प्रियांका चोप्राच्या वाट्याला आला, ज्यात तिने नकारात्मक भूमिका केली होती. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

हॉलिवूडमध्येही एन्ट्री

यानंतर तिने सलग हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली. 'दोस्ताना' चित्रपटातून प्रियंका चोप्राला ‘देसी गर्ल’चा टॅग मिळाला होता. यानंतर प्रियांका चोप्राला हॉलिवूडमधून ऑफर आली. हॉलिवूडमध्ये तिने 'क्वांटिको' आणि 'बेवॉच'सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले.

प्रियांका चोप्रा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 'द व्हाईट टायगर'मध्ये झळकली होती. त्याचबरोबर ती 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन' या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती. प्रियांकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय हॉलिवूड चित्रपट 'सिटाडेल' आणि अभिनेता अँथनी मॅकीसोबतचा अॅक्शन फिल्म 'एंडिंग थिंग्ज' मध्ये देखील प्रियांका चोप्रा झळकणार आहे.

हेही वाचा :

Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर

Priyanka Chopra, Nick Jonas : ‘मालती आणि मालतीचे बाबा’, प्रियांका चोप्राने शेअर केला निक जोनास अन् लेकीचा खास फोटो!

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget