एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Gadar 2 : सनी देओलच्या 'गदर 2'ने रचला इतिहास; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या...

Sunny Deol Ammesha Patel Gadar 2 Success Reasons : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) अभिनित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित या सिनेमाने इतिहास रचला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर (Independence Day)  प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मोठ्या वीकेंडचा चांगलाच फायला झाला आहे. 'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सनी देओलचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्यामुळेच त्याचा 'गदर 2' हा सिनेमा एवढा का चालतोय?  असा प्रश्न उपस्थित होतो.

Akshay Kumar : अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी एकही रुपये घेतला नाही; निर्मात्यांची माहिती

Akshay Kumar Charge Fees OMG 2 : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. एकीकडे सनी देओल आणि अमिषा पटेलचा (Ameesha Patel) 'गदर 2' (Gadar 2) आणि रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. तरीही अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. दरम्यान खिलाडी कुमारने 'ओएमजी 2' या सिनेमासाठी मानधन घेतलं नसल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. 

Khupte Tithe Gupte : "मी राहुल गांधींची भूमिका केली तर..."; सुबोध भावेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

Subodh Bhave In Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हजेरी लावणार आहे. सुबोध भावेने आजवर लोकमान्य टिळक, बालगंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा वेगवेगळ्या बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सुबोधला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बायोपिकबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला आहे.

15:59 PM (IST)  •  19 Aug 2023

Jawan Advance Booking : शाहरुख खानच्या 'जवान'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; रिलीजआधीच मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड

Shah Rukh Khan Jawan Movie Advance Booking : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. कोरोनानंतर किंग खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता अभिनेत्याच्या 'जवान' या सिनेमाकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. 

Jawan Advance Booking : शाहरुख खानच्या 'जवान'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; रिलीजआधीच मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड

15:03 PM (IST)  •  19 Aug 2023

Ghoomer : अभिषेकच्या 'घूमर'चं बीग बींसह ऐश्वर्या राय बच्चनने केलं कौतुक; म्हणाले...

Amitabh Bachchan Aishwarya Rai Bachchan On Abhishek Bachchan Ghoomer : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील या सिनेमाचं आणि अभिषेकच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील लेकांचं कौतुक केलं आहे. तसेच ऐश्वर्या राय बच्चनलाही 'घूमर' आवडला आहे. 

Ghoomer : अभिषेकच्या 'घूमर'चं बीग बींसह ऐश्वर्या राय बच्चनने केलं कौतुक; म्हणाले...

14:11 PM (IST)  •  19 Aug 2023

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तीन अडकून सीताराम'

Prajakta Mali New Marathi Movie Teen Adkun Sitaram : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आगामी  सिनेमाचं नाव 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) असं आहे. आगामी सिनेमाची घोषणा करत सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तीन अडकून सीताराम'

12:53 PM (IST)  •  19 Aug 2023

Mangesh Desai : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे 'धर्मवीर 2'; निर्माते मंगेश देसाई यांची माहिती

Mangesh Desai ON Dharmaveer 2 : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली आहे. 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं मंगेश देसाई म्हणाले.

Mangesh Desai : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे 'धर्मवीर 2'; निर्माते मंगेश देसाई यांची माहिती

11:56 AM (IST)  •  19 Aug 2023

TV Actor Pawan Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पवन सिंहचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 25 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

TV Actor Pawan Singh Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पवन सिंहचे (Pawan Singh) निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचे निधन झाले आहे. वयाच्या 25 व्या वर्षी त्याने मुंबईत राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. पवन सिंहच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

TV Actor Pawan Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पवन सिंहचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 25 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget