एक्स्प्लोर

विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार

विमानात बिघाड झाला असल्यास एअर इंडियाने प्रवाशांना अन्य विमानाने त्यांच्या इच्छित स्थळाकडे रवाना करणे आवश्यक आहे.

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) आज सकाळी एअर इंडियाच्या  ए आय 866 या  विमानाने सकाळी 9 वाजता दिल्लीला रवाना होण्यासाठी विमानात आसनस्थ झाले. दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ना.रामदास आठवले एअर इंडियाच्या (Air India) विमानाने रवाना झाले. विमान आकाशात झेपावल्यानंतर उंच आकाशात विमानात तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुन्हा मुंबई विमानतळावर विमानाचे यशस्वी लँडिंग होत ते उतरवण्यात आले. त्यात सर्व प्रवासी सुखरुप असून ना. रामदास आठवले सुध्दा सुखरुप आहेत. मात्र , विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर सुद्धा विमान दुरुस्ती करण्यासाठी ते विमान चार तासापासून विमान तळावरच थांबवण्यात आले. सकाळी 9 वाजल्या पासुन दुपारी 1 वाजेपर्यंत हे विमान, विमानतळावरच थांबवण्यात आले आहे . त्यामुळे सकाळी 8 वाजता विमानतळावर आलेले केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले आणि अनेक प्रवासी या विमानात दुपारी 1 वाजेपर्यंत विमानतळावर अडकून होते. 

विमानात बिघाड झाला असल्यास एअर इंडियाने प्रवाशांना अन्य विमानाने त्यांच्या इच्छित स्थळाकडे रवाना करणे आवश्यक आहे. मात्र, 6 तासांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना ताटकळत विमानात कोंडून ठेवणे चूक आहे. एअर इंडियाचा हा  गलथान कारभार पाहून सर्व प्रवासी संतप्त झाले होते. केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले एअर इंडियाच्या या भोंगळ कारभारावर नाराज झाले असून त्यांनी एअर इंडियाची तक्रार नगरी उड्डाणमंत्री के.आर. नायडू यांच्याकडे करणार असल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यास विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने प्रवासाची मुभा दिली पाहिजे. मात्र, एअर इंडियांने तांत्रिक बिघाड झालेल्या विमानातच प्रवाशांना बसवून फार मोठा अन्याय केला आहे. हा एअर इंडियाचा गलथान कारभार अक्षम्य आहे. या ढिसाळ वृत्तीच्या कारभारावर आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय हवाई नागरी उड्डाण मंत्री के आर नायडू यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही सांगितले. 

आठवलेंनीही दिरंगाईचा फटका

दरम्यान, एअर इंडियांच्या ऐ आय866 या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र एअर इंडियांने लोकांना त्याच विमानात पाच तास बसवून त्यांना वेठिस धरले आहे. त्यांचा अमुल्य वेळ वाया गेला आहे. या दिरगांईचा सर्व प्रवशांना फार मोठा फटका बसला आहे. एअर इंडियाच्या दिरंगाईचा फटका ना.रामदास आठवले यांना सुध्दा आज बसला आहे.

हेही वाचा

मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget