Dharmaveer 2 : "उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..."; प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी केली 'धर्मवीर-2' ची घोषणा
धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता धर्मवीर-2 (Dharmaveer 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
![Dharmaveer 2 : Dharmaveer 2 Mangesh Desai and Pravin Tarde marathi movie official announcement share poster on social media Dharmaveer 2 :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/4cd17323fff19b7e936769a8d229ed021691557965353259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dharmaveer 2 : मराठी चित्रपटांना सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. धर्मवीर-2 (Dharmaveer 2) या चित्रपटाची घोषणा प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली आहे. धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता धर्मवीर-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मवीर या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांच्या जीवनात घडलेल्या घटना दाखवण्यात आल्या. आता धर्मवीर-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
मंगेश देसाई यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि 'असा माणूस होणे नाही' हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे - भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच...बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2...साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच.."
View this post on Instagram
धर्मवीर 2 या चित्रपटाचं पोस्टर देखील मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, 'अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार.सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर 2' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे. "धर्मवीर 2" मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट.'
View this post on Instagram
धर्मवीर 2 या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन प्रवीण तरडे करणार आहे तर या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई करणार आहेत. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)