एक्स्प्लोर

Dadasaheb Phalke Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याविषयी जाणून घ्या काही रंजक गोष्टी...

Dadasaheb Phalke Birth Anniversary : भारतीय चित्रपट कलेला वैभव मिळवून देणाऱ्या दादासाहेब फाळकेंना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते.

Dadasaheb Phalke Birth Anniversary : 30 एप्रिल 1870 रोजी जन्मलेले धुंडिराज गोविंद फाळके हे बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एका छोट्या गावातून आले होते. दादासाहेब फाळके हे भारतीय दिग्दर्शक, निर्माता, पटकथा, लेखक, छायाचित्रकार, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक, संपादक आणि वितरक होते. भारतीय चित्रपट कलेला वैभव मिळवून देणाऱ्या दादासाहेब फाळकेंना भारतीय चित्रपटांचा जनक म्हटलं जातं. 1913 साली त्यांनी तयार केलेला पहिला मूक चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र‘ चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे. आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी 95 चित्रपटांची आणि 26 लघुपटांची निर्मिती केली.

त्यांचा शेवटचा चित्रपट, गंगावतरण (1937) हा आवाज आणि संवादांसह दादासाहेबांनी बनवलेला एकमेव चित्रपट होता. 1944 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, भारत सरकारने त्यांच्या नावावर 1969 मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' या नावाने पुरस्कार सुरू केला. भारतीय चित्रपटांच्या विकासातील मौल्यवान योगदानाची दखल घेणारा हा देशातील चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

Dadasaheb Phalke Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याविषयी जाणून घ्या काही रंजक गोष्टी...

दादासाहेब फाळकेंविषयी काही रंजक किस्से : 

1. वयाच्या 15 व्या वर्षी दादासाहेबांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला जिथे त्यांनी शिल्पकला, चित्रकला आणि फोटोग्राफीचा अभ्यास केला.

2. 1890 मध्ये, ते वडोदरा, गुजरात येथे छायाचित्रकार म्हणून काम करण्यासाठी गेले.

3. बुबोनिक प्लेगचा बळी ठरलेल्या आपली पहिली पत्नी आणि मूल गमावल्यानंतर दादासाहेबांनी फोटोग्राफीची नोकरी सोडली.

4. त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्यास सुरुवात केली परंतु महाराष्ट्रात स्वतःचे मुद्रणालय सुरू करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला.

5. भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्यासोबत काम केल्यानंतर, दादासाहेबांनी त्यांचा पहिला परदेश दौरा केला आणि जर्मनीत कार्ल हर्ट्झ या जादूगारासोबत काम केले.

6. फर्डिनांड झेक्का यांचा 'द लाइफ ऑफ क्राइस्ट' हा मूकपट पाहिल्यानंतर दादासाहेबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याच वेळी दादासाहेबांनी पहिला चित्रपट बनविण्याचे ठरविले.

7. दादासाहेबांनी दिग्दर्शन, वितरण, सेट-बिल्डिंग नियंत्रित केले आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटात हरिश्चंद्राची भूमिकाही केली. त्यांच्या पत्नीने कॉस्च्युम डिझायनिंगचे व्यवस्थापन केले आणि त्यांच्या मुलाने या चित्रपटात हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली. संपूर्ण फीचर बनविण्यासाठी दादासाहेबांनी 15 हजार रुपये लागले. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget