एक्स्प्लोर
झहीर-सागरिकाचा साखरपुडा, नजरा विराट-अनुष्काकडे
मुंबई : 'चक दे' गर्ल, अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांचा साखरपुडा मंगळवारी मुंबईत झाला. या सोहळ्याला विराट आणि अनुष्का यांनी हातात हात घालून हजेरी लावल्यामुळे उत्सवमूर्तीपेक्षा त्या दोघांकडेच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अनुष्का साखरपुड्याला आली होती, तर विराट पांढरा शर्ट आणि काळी ट्राऊझर घातली होती. गेल्यावर्षी युवराजच्या रिसेप्शनमध्येही विराट-अनुष्का शोस्टॉपर ठरले होते. त्यानंतर झॅक-सागरिकाच्या साखरपुड्यातही त्यांच्याकडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
गेल्या महिन्यात सागरिका-झहीर यांनी ट्विटरवरुन आपल्या 'एंगेजमेंट'ची घोषणा केली होती. त्यानंतर मंगळवारी दोघांचा साग्रसंगीत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली,
युवराज सिंग, रवीना टंडन आणि पती अनिल थडानी, रोहित शर्मा आणि पत्नी रितीका, मंदिरा बेदी, प्राची देसाई यांनी हजेरी लावली.
'झहीर खूप आधीपासून एंगेजमेंटची तयारी करत होता. मला अजिबात याबाबत कल्पना नव्हती. त्याने माझ्यासाठी इतकी सुंदर अंगठी घेतली आहे, याची पुसटशीही आयडिया नव्हती. मी त्या क्षणाचं वर्णनही करु शकत नाही. हा अनुभव आम्हा दोघांसाठी नेहमीच खास असेल.' अशा भावना सागरिकाने व्यक्त केल्या आहेत.
पाहा फोटो :
झहीर खान-सागरिकाचा साखरपुडा, सचिन, विराटसह सेलिब्रिटींची हजेरी!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा झहीर खान मागील आठ-नऊ महिन्यांपासून सागरिकासोबत डेटिंग करत आहे. एका कॉमन फ्रेण्डद्वारे या दोघांची भेट झाली आणि काही काळातच ते दोघे जवळ आले. झहीर आणि सागरिका अनेक कार्यक्रमात आणि पार्टीमध्ये एकमेकांसोबत दिसतात. आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. कोण आहे सागरिका घाटगे 1. 2007 मध्ये आलेल्या 'चक दे इंडिया' या सिनेमातून सागरिका लाईमलाईटमध्ये आली. या सिनेमात सागरिकाने साकारलेली प्रीती सबरवाल ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. पहिल्याच सिनेमात शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी सागरिकाला मिळाली. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्टार स्क्रीन अॅवॉर्डही मिळाला. 2. चक दे नंतर सागरिकाने फॉक्स, मिले ना मिले हम, रश, जी भर के जीले, इरादा अश्या बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. 3. दिलदरिया हा सागरिकाचा पहिला पंजाबी सिनेमा. या सिनेमासाठी सागरिकाने पंजाबी भाषेचेही धडे गिरवले 4. हिंदी आणि पंजाबी भाषिक सिनेमांसोबतच सागरिकाने मराठीमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. 2013 मध्ये सतीश राजवाडे दिग्दर्शित 'प्रेमाची गोष्ट'मध्ये सागरिका झळकली होती. 5. अभिनयासोबतच सागरिका नॅशनल लेव्हलची ख्यातनाम अॅथलिटही आहे. 6. सागरिका खतरोंके खिलाडीच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती. यात तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.संबंधित बातम्या :
रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर!
झहीर-सागरिकाला शुभेच्छा देताना कुंबळेंकडून मोठी चूक!
झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement