एक्स्प्लोर
रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर!

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाल्य़ाचं झहीरनं ट्विट केलं. झहीरनं दोघांचा अंगठी घातलेला फोटोही ट्विटरवरुन शेअर केला आहे. चक दे इंडियात सागरिकानं क्रिकेटरच्या प्रेयसीची भूमिका निभावली होती. आता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही क्रिकेटपटू झहीर खानसोबत सागरिका एन्गेज झाली आहे.
तुमच्या पत्नीच्या पसंतीवर कधीही हसू नका, तुम्ही तिच्या निवडीपैकीच एक आहात. पार्टनर फॉर लाईफ, एन्गेज्ड सागरिका घाटगे, असं ट्विटमध्ये झहीरनं म्हटलं आहे.
https://twitter.com/ImZaheer/status/856535878193168384
क्रिकेटर युवराज सिंह आणि अभिनेत्री-मॉडेल हेजल कीच यांच्या लग्नातही फक्त विराट-अनुष्काच आकर्षणाचं केंद्र नव्हते, तर झहीर खान आणि सागरिका घाटगेवर सर्वांचं लक्ष होतं.
झहीर खान आणि सागरिका घाटगे रिलेशनशिपमध्ये?
झहीर खान ‘चक दे इंडिया’ या सिनेमातील अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत युवराजच्या लग्नाला हजर होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा झहीर खान मागील आठ महिन्यांपासून ‘चक दे’ गर्ल सागरिकासोबत डेटिंग करत आहे. एका कॉमन फ्रेण्डद्वारे या दोघांची भेट झाली आणि काही काळातच ते दोघे जवळ आले. झहीर आणि सागरिका अनेक कार्यक्रमात आणि पार्टीमध्ये एकमेकांसोबत दिसतात. आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
दोघांमधील नातं गेल्या काही महिन्यांमध्ये आणखी दृढ झालं आहे. गोव्यात युवराज आणि हेजलच्या लग्नाबरोबरच जयपूरमधील एका कार्यक्रमातही दोघे एकत्र दिसले होते.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement

















