एक्स्प्लोर

हेझलचं नाव बदलण्याचा सल्ला, युवराजचे पिता भडकले

मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि ब्रिटिश अभिनेत्री हेझल कीच विवाहबंधनात अडकून काहीच दिवस झाले आहेत. लग्नानंतर हेझलचं नाव बदलण्याविषयी युवराजच्या कुटुंबीयांना सुचवण्यात आलं, मात्र या सल्ल्यामुळे युवराजचे पिता योगराज सिंग चांगलेच संतापले आहेत. 30 नोव्हेंबर 2016 रोजी हेझल आणि युवराज चंदिगढमध्ये विवाहबद्ध झाले. हेझलचं नाव लग्नानंतर गुरबसंत कौर ठेवलं जाणार असल्याच्या चर्चा होत्या. सिंग कुटुंबाचे गुरु बाबा राम सिंग यांनी हे नाव सुचवल्याचं सांगितलं जातं. मात्र सासरेबुवा योगराज सिंग यांनी हा सल्ला फारसा रुचलेला नाही. 'हा काय मूर्खपणा आहे? माझ्यासाठी हेझल ही हेझलच राहणार कायम. नावात बदल केल्यामुळे तिची ओळख पुसली जाणार नाही' असं योगराज सिंग संतापाच्या स्वरात म्हणाले. 'माझा फक्त एकाच देवावर विश्वास आहे. ही सगळी स्वयंघोषित बाबा-महाराजांची वायफळ बडबड आहे.' असंही योगराज म्हणाले. 'युवराजची आई आणि आमच्या इतर कुटुंबीयांनी युवराजच्या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र बाबा-महाराजांच्या बोलण्यावर माझा विश्वास नसल्यामुळे गेलो नव्हतो. अशा बडबडीमुळे माणसाचं नशीब बदलत नाही.' असा घणाघातही योगराज यांनी केला. 'माझ्या दृष्टीने ती सौ. हेझल युवराज सिंग आहे. नाव बदलण्याचा मुद्दा मी गांभीर्याने घेत नाही.' असंही योगराज यांनी स्पष्ट केलं. युवराज आणि झोरावर ही योगराज आणि शबनम सिंग यांची मुलं आहेत. मात्र शबनम यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर योगराज यांनी सतबीर कौर यांच्याशी लग्न केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget