एक्स्प्लोर
सुपरकॉप राकेश मारिया यांच्या कारकीर्दीवर वेब सीरिज
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या कारकीर्दीवर आधारित वेब सीरिजचं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि 'सुपरकॉप' अशी ख्याती असलेल्या राकेश मारिया यांच्या कारकीर्दीवर लवकरच एक वेब सीरिज येणार आहे. मेघना गुलजार या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.
राकेश मारिया 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. या वेबसीरीजमध्ये 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, गेटवे आणि झवेरी बाजार बॉम्बस्फोट, मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला, नीरज ग्रोव्हर हत्याकांड, शीना बोरा हत्याकांड यासारख्या घटना दाखवल्या जाणार आहेत. मारिया गेल्या वर्षी होम गार्ड विभागाच्या पोलिस महासंचालकपदी निवृत्त झाले.
राकेश मारिया यांची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
अनिल अंबानी यांच्या 'रिलायन्स एन्टरटेन्मेंट'च्या 'फॅण्टम फिल्म'तर्फे या सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. फिलहाल, तलवार, राझी यासारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.Taut files of a top cop! An original series on the life and case files of former Mumbai CP, #RakeshMaria. Excited to be telling these stories with @RelianceEnt @FuhSePhantom & #MadhuMantenahttps://t.co/9rnaYoaOP9 pic.twitter.com/VLpYJRanKw
— Meghna Gulzar (@meghnagulzar) August 6, 2018
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























