एक्स्प्लोर
नरेंद्र मोदींवर चित्रपट, विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित चित्रपट येत असून अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत
मुंबई : 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं आयुष्य पुढच्या आठवड्यात रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. विवेक ओबेरॉय या सिनेमात मोदींची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये बायोपिकचं अक्षरशः पीक आलं आहे. त्यात मोदींवरील चरित्रपटाने एकाची भर पडणार आहे. सरबजीत, मेरी कोम सारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप सिंग या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
7 जानेवारीला पोस्टरचा फर्स्ट लूक प्रदर्शित होणार आहे. मोदींच्या व्यक्तिरेखेत विवेक ओबेरॉय कसा दिसेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. चित्रपटाच्या शूटिंगला जानेवारीच्या मध्यावधीत सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकांच्या आधी हा सिनेमा रिलीज होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या सिनेमात आणखी कोणकोणत्या व्यक्तिरेखा असणार, त्या भूमिका कोण साकारणार, मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील कोणकोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकला जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
बॉलिवूडमधील गेल्या काही वर्षांत गाजलेले बायोपिक
भाग मिल्खा भाग - धावपटू मिल्खासिंग
एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी - क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी
नीरजा - दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोत
मेरी कोम - बॉक्सर मेरी कोम
द डर्टी पिक्चर - दाक्षिणात्य स्टार सिल्क स्मिता
पान सिंग तोमर - धावपटू पान सिंग तोमर
बँडिट क्वीन - फूलन देवी
दंगल - कुस्तीपटू फोगट भगिनी
नेताजी सुभाषचंद्र बोस : अ फरगॉटन हिरो - नेताजी सुभाषचंद्र बोस
सरबजीत - पाकिस्तानच्या तुरुंगातील भारतीय कैदी सरबजीत
मांझी : द माऊंटन मॅन - दशरथ मांझी
हसीना पारकर - हसीना पारकर
पॅडमॅन - अरुणाचलम मुरुगनंथम
संजू- संजय दत्त
आगामी बायोपिक
तानाजी - तानाजी मालुसरे
मणिकर्णिका - राणी लक्ष्मीबाई
मोगल - गुलशन कुमार
गली बॉईज - मुंबईतील रॅपर डिवाईन
सुपर 30 - गणितज्ज्ञ आनंद कुमार
केसरी - साराग्रही संग्रामातील हवलदार इशर सिंग
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू
फुलराणी सायना नेहवाल
पॉर्नस्टार शकीला
अंतराळवीर राकेश शर्मा
मराठीमधील बायोपिक
बालगंधर्व - बालगंधर्व
लोकमान्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
एक अलबेला - भगवानदादा
...आणि डॉ काशिनाथ घाणेकर- अभिनेते डॉ काशिनाथ घाणेकर
प्रकाश बाबा आमटे - लोकनेते प्रकाश बाबा आमटे
भाई- व्यक्ती की वल्ली - पु. ल. देशपांडे
येल्लो - डाऊन सिंड्रोमग्रस्त स्विमर गौरी गाडगीळ
ठाकरे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement