एक्स्प्लोर

तुझ्यासोबत प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन्स डे, कोहलीचा अनुष्काला मेसेज

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अफेअरबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात. दोघांनीही याबाबत अधिकृत वाच्यता केली नसली, तरी विराट कोहलीने त्यांच्या प्रेमाबाबत उघड संकेत दिले आहेत. ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियांवर विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'जर तुमची इच्छा असेल, तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो. तू माझ्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे करतेस' अशा आशयाच्या ट्वीटसोबत विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंत अनुष्काशी नाव जोडलं गेल्याने आगपाखड करणाऱ्या विराटने अशा हिंट्स दिल्या आहेत. त्यामुळे साहजिकच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Everyday is a valentine day if you want it to be. You make everyday seem like one for me ❤❤. @anushkasharma

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट आणि अनुष्काला एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र मधल्या काळात त्यांच्या नात्यातही 'बॅड पॅच' आल्याचं म्हटलं जायचं. दोघांचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चा होत्या, मात्र पुन्हा दोघे एकत्र दिसले. दोघांनी उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी कोहलीच्या अनेक मॅचेसना अनुष्का न चुकता हजेरी लावायची.

विराटला 'फिलौरी'चा निर्माता म्हणणं माझा अपमान, अनुष्काचा संताप

विशेष म्हणजे, अनुष्काने उपस्थिती लावली असताना टीम इंडिया एकदा सामना हरली होती. मात्र सोशल मीडियावर या पराभवाचं खापर अनुष्कावर फोडलं होतं. त्यावर चिडलेल्या विराटने टवाळखोरांचा चांगलाच समाचार घेतला होता. काहीच दिवसांपूर्वी 'फिलौरी'या अनुष्काची निर्मिती असलेल्या चित्रपटात विराटने पैसे ओतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावरुनही अनुष्काने आगपाखड केली होती. त्यामुळे दोघांमध्ये सारं काही आलबेल आहे की नाही, अशा शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाल्या होत्या. करिअरमध्ये जानेवारी 2016 पासून कोहलीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडित काढले आहेत. वन डे क्रिकेटचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतरही कोहलीने अजिंक्य राहण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे अनुष्काचे सुलतान, ऐ दिल है मुश्किल यासारखे चित्रपटही गाजत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Team India Squad for Champions Trophy 2025 : बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त 'या' शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!
पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त 'या' शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTVABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 14 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSolapur Garage Worker :आव्हानांचा वेढा, तरी MPSC त झेंडा;सोलापुरच्या बहिणींची यशोगाथा Special ReportZero Hour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटीतून काय साध्य होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Team India Squad for Champions Trophy 2025 : बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त 'या' शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!
पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त 'या' शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!
RBI News Update: मोठी बातमी, मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई 
मोठी बातमी, मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई 
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
कराड हादरलं.. 30 वर्षांच्या महिलेवर तरुणाकडून कोयत्यानं हल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात नेलं
कराडच्या मलकापूरमधील दांगट वस्तीत धक्कादायक घटना, महिलेवर कोयत्यानं हल्ला
Beed Crime: बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.