एक्स्प्लोर
कपिलसारख्यांच्या ट्वीटला पंतप्रधान मोदींचे एक महिन्यापूर्वीच उत्तर
मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्वीटमध्ये मेन्शन करून ट्वीट केले होते. कपिलच्या या ट्वीटने एकच खळबळ उडाली होती. कपिलच्या एका ट्वीटमुळे अक्षरश: सारे प्रशासन खडबडून जागे झाले होते. पालिका अधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत साऱ्यांनीच कपिलला लाचखोर अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्याचे आवाहन केले होते.
यानंतर पालिकेनेही अधिक शहानिशा केल्यानंतर कपिल शर्माचेच पितळ उघडे पडले. यानंतर कपिलवर आपल्या त्या ट्वीटवरूवन सारवासारव करण्याची वेळ आली. पालिका प्रशासनाने कपिलला अवैध बांधकामासंदर्भात नोटीस बजावली होती.
पण कपिलच्या एका ट्वीटमुळे पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे बाभाडे यानिमित्ताने बाहेर आले होते. त्याने पंतप्रधानांच्या नावे ट्वीट करताना 'हेच का ते अच्छे दिन?' असा सवाल उपस्थित केला होता. पण कपिलच्या या ट्वीटला पंतप्रधान मोदींनी एक महिन्यापूर्वीच होते. यासंबंधातील कपिलला उत्तर दिलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतो आहे.
या व्हिडीओत ऑगस्ट महिन्यातील माय गव्हर्नमेंट या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा बखुबीने वापर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 ऑगस्ट रोजी माय गव्हर्नमेंट या आपल्या कार्यक्रमात बोलताना, काही ओपिनियन मेकर स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीवर कुठेही काही घडले तर, त्याला पंतप्रधानांना दोषी धरल्याबद्दल प्रत्युत्तर दिले होते. यामुळे गव्हर्नन्सला कशाप्रकारे नुकसान पोहचू शकते याची माहिती दिली होती.
भाषातील हाच भाग वापरून एक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्कींग साऊट यूट्यूबवरून कमालीचा व्हायरल होतो आहे. यूट्यूबवर या व्हिडीओला दोनच दिवसात दोन लाखाहूनही जास्त लोकांनी पाहिले आहे.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या
ट्वीट कपिलवरच बूमरँग, पाडकामाचा खर्च पालिका वसूल करणार
…अन्यथा कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन : राम कदम
मनसे-सेना-भाजपवर आरोप कुठे केला? : कपिल शर्मा
लाचखोरीत मध्यस्थीचा पुरावा द्या अन्यथा…, कपिलला मनसेचा इशारा
कपिल शर्माचं ऑफिसच वादात, ते ट्विट कपिलवरच उलटणार?
कपिल भाई, लाचखोराचं नाव सांग, त्याला सोडणार नाही : मुख्यमंत्री
कपिलचा मुखवटा घालून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बीएमसीने 5 लाखांची लाच मागितली : कपिल शर्मा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement