एक्स्प्लोर

JugJugg Jeeyo On OTT : नीतू कपूर-अनिल कपूर यांचा ‘जुगजुग जियो’ ओटीटीवर रिलीज! कधी आणि कुठे पाहता येणार, जाणून घ्या...

JugJugg Jeeyo On OTT : ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

JugJugg Jeeyo On OTT : बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा बहुप्रतीक्षित ‘जुग जुग जियो’ (JugJugg Jeeyo) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पुन्हा पदार्पण केल्याने, त्यांच्या निर्णयाचे खूप कौतुक झाले. ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार असून, तो प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Videoवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. Amazon Prime Day अर्थात 23-24 जुलैला प्रेक्षकांना चित्रपटांची विशेष मेजवानी मिळणार आहे. तर, 23 जुलैला ‘जुग जुग जियो’ चित्रपट देखील रिलीज होणार आहे. सबस्क्रिप्शन असणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हा चित्रपट पाहता येणार आहे.

जगभरात पार केला 100 कोटींचा टप्पा

कियारा अडवाणी, वरुण धवनचा 'जुग जुग जिओ' हा चित्रपट 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या चित्रपटत प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या चित्रपटत अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटने जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

तगडी स्टारकास्ट

नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या चित्रपटच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. चित्रपटत असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या चित्रपटची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि तो घरबसल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'च्या निर्मात्यांना बसला आर्थिक फटका; कमाईच्या बाबतीत पडला मागे

Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection : बॉक्स ऑफिसवर ‘जुग जुग जियो’चा धुमाकूळ; तीन दिवसात कमावले 60 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget