एक्स्प्लोर
'दंगल'मधील आमीरचा मस्क्युलर लूक
मुंबई : आगामी 'दंगल' या सिनेमातील बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा लूक समोर आला आहे. याआधी सिनेमाचे काही टीझर पोस्टर रिलीज झाले होते, ज्यात आमीरच्या चेहऱ्याची केवळ झलकच दिसली होती.
स्वत: आमीरने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तरुण महावीरच्या रुपातील चित्रीकरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी आमीरचं बलंदड शरीर पाहून कोणीही थक्क होईल.
https://twitter.com/aamir_khan/status/742281157824286724
या सिनेमात आमीर खानने पैलवान आणि ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारत आहे. वयोवृद्ध महावीरच्या रुपातील शूटिंग पूर्ण झालं असून आता तरुण महावीर असलेला भाग चित्रीत केलं जाणार आहे. या भूमिकेसाठी आमीरने सुरुवातीला त्याचं वजन सुमारे 90 किलोपर्यंत वाढवलं होतं. आता तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याने वजन कमी केलं आहे. त्यामुळे सिनेमाता उर्वरित भागाचं शूटिंग पूर्ण करण्यासाठी तयार आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'दंगल' सिनेमा 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement