एक्स्प्लोर
Advertisement
महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड
मुंबई : वादग्रस्त ट्वीट्ससाठी विख्यात असलेला बॉलिवूडचा पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. महिलांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट्स केल्याप्रकरणी ट्विटरकडून अभिजीतचं
अकाऊण्ट सस्पेंड करण्यात आलं आहे.
अनुचित भाषेचा वापर करत अपमानकारक ट्वीट केल्याची तक्रार सोशल मीडिया युझर्सनी केल्यानंतर ट्विटरकडून त्याची तात्काळ दखल घेण्यात आली आणि अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर हँडल बंद करण्यात आलं. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केल्याने हे अकाऊण्ट ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आलं.
"Account Suspended: Twitter suspends accounts that violate the Twitter Rules" असा संदेश त्याच्या ट्विटर हँडलवर दिसत आहे. @abhijeetsinger हे त्याचं ट्विटर अकाऊण्ट व्हेरिफाईड होतं.
अभिजीतने गेल्या वर्षी जुलै महिन्यात पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्याविषयी प्रक्षोभक भाषेत ट्वीट केले होते. त्यामुळे स्वाती यांनी अभिजीत विरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याला अटक आणि जामिनावर सुटका झाली होती.
22 मे रोजी जेएनयूची विद्यार्थिनी शेहला रशिदसह काही महिला ट्विटराईट्सवर त्याने हीन शब्दात टीका केली होती. त्यानंतर अभिजीत विरोधात सोशल मीडिया यूझर्सनी तक्रार केली. अभिजीतने हे ट्वीट डिलीट केलं, त्यानंतर ट्विटरने कारवाई करत त्याचं अकाऊण्ट सस्पेंड केलं. मात्र हे तात्पुरतं सस्पेंशन आहे की कायमस्वरुपी हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
https://twitter.com/Shehla_Rashid/status/867021264631742464
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement