Beast Trailer Release : विजय थलापतीच्या 'बीस्ट'चा ट्रेलर रिलीज, सिनेमात अॅक्शनचा तडका
Beast Trailer Release : विजय थलापतीच्या 'बीस्ट' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Beast Trailer Release : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) 'बीस्ट' (Beast) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नेल्सन दिलीपकुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'बीस्ट' सिनेमात विजय थलापती आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. विजय थलापती, नेल्सन दिलीपकुमार आणि पूजा हेगडेने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला आहे. 'बीस्ट' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे.
View this post on Instagram
ट्रेलरमध्ये विजय थलापती अॅक्शन करताना दिसत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेची फक्त एक छोटीशी झलक आहे. हा सिनेमा 13 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. 'बीस्ट' सिनेमात विजय थलापतीसह पूजा हेगडे, सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Bhirkit : गिरीश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर आऊट, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'गुल्हर'चं नवं पोस्टर लॉंच
My Dad’s Wedding : गुढी पाडव्याच्या निमित्ताने सुभाष घईंच्या 'माय डॅड्स वेडिंग'ची घोषणा, पहिले पोस्टरही रिलीज!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha