Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'गुल्हर'चं नवं पोस्टर लॉंच
Gulhar : 'गुल्हर' सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'गुल्हर' (Gulhar) सिनेमाचे नवे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. 'गुल्हर' या आगामी मराठी सिनेमात प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं नावीन्यपूर्ण आणि सशक्त कथानक पहायला मिळणार आहे. हा सिनेमा 6 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
'गुल्हर'मध्ये प्रेक्षकांना रवी काळे आणि भार्गवी चिरमुले या दोन आघाडीच्या कलाकारांच्या रूपात एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे. 'गुल्हर'चे दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केलं आहे. सिनेमात रवीने गिरीजू ही भूमिका साकारली आहे. तर भार्गवी राधेच्या भूमिकेत आहे.
View this post on Instagram
मराठीसोबतच हिंदी सिनेमात बऱ्याचदा नाविन्यपूर्ण भूमिकेत झळकलेले रवी या सिनेमात अतिशय सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत आहेत. डोक्यावर फेटा, हातात घुंगरूवाली काठी, कपाळावर हळदीचा मळवट, खांद्यावर उपरणं, गळ्यात धनगरी तावीज, सदरा, धोतर आणि वाढलेली दाढी असं काहीसं रवी यांचं रूप या सिनेमात आहे.
नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या 'गुल्हर' सिनेमाच्या पोस्टरमध्ये प्रगतीपासून लाखो कोस दूर असलेल्या, तसंच प्रतिकूल परिस्थितीतही सुखी वाटणाऱ्या कटुंबाचं चित्र पहायला मिळतं आहे. या सिनेमाची कथा एका 11 वर्षाच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. मोहन पडवळ यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे.
संबंधित बातम्या
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा, चाहत्यांना दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा
My Dad’s Wedding : गुढी पाडव्याच्या निमित्ताने सुभाष घईंच्या 'माय डॅड्स वेडिंग'ची घोषणा, पहिले पोस्टरही रिलीज!
Jatra 2 : ‘अलबत्या गलबत्या कोण फोडेल….’, नवीन वर्षांत ‘जत्रा2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
