Friday Movies Release : यंदाचा वीकेंड सिनेप्रेक्षकांसाठी खास, शुक्रवारी प्रदर्शित झाले 'हे' सिनेमे
Movies : शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची प्रेक्षक प्रतीक्षा करत असतात.
![Friday Movies Release : यंदाचा वीकेंड सिनेप्रेक्षकांसाठी खास, शुक्रवारी प्रदर्शित झाले 'हे' सिनेमे This weekend special these movie was released on Friday Friday Movies Release : यंदाचा वीकेंड सिनेप्रेक्षकांसाठी खास, शुक्रवारी प्रदर्शित झाले 'हे' सिनेमे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/e6b5a4dbca44c761c5caf4b817825847_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Friday Movies Release : शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. तर काही सिने रसिक वीकेंडला कोणता सिनेमा पाहायचा हे ठरवत असतात. आज शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे या शुक्रवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. कोरोनामुळे अनेक सिने-निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलत होते. कोरोनाचा सिनेसृष्टीला चांगलाच फटका बसला होता. पण आता पुन्हा सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे आता अनेक निर्माते त्यांचे सिनेमे प्रदर्शित करू लागले आहेत. बॉलिवूडसह मराठी सिनेमेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत.
जयेशभाई जोरदार
'जयेशभाई जोरदार' हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर यांनी केले आहे. हा विनोदी सिनेमा असून या सिनेमात रणवीर एका सरपंचाचा मुलगा दाखवण्यात आला आहे. स्री-पुरुष समानतेवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. प्रविण तरडे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
सौंकन सौंकने
सौंकन सौंकने हा एक पंजाबी सिनेमा आहे. एम्मी विर्क, सरगुन मेहता आणि निम्रत खैरा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. अमरजीत सिंह यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
जो और जो
जो और जो हा मल्याळम विनोदी सिनेमा आहे. नवोदित अरुण डी जोस यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात निखिला विमल, मॅथ्यू थॉमस, नेस्लेनचे गफूर जॉनी अँटोनी आणि स्मिनू सिजो यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संबंधित बातम्या
Modern Love Mumbai Twitter Review : सहा दिग्दर्शक अन् सहा वेगवेगळ्या कथा, पाहा प्रेक्षकांना कशी वाटली ‘मॉडर्न लव्ह मुंबई’...
Dharmaveer : 'धर्मवीर'ने रचला विक्रम; 400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज
Dharamveer : आनंद दिघेंच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला 'धर्मवीर' चा पहिला खास शो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)