Ye Re Ye Re Pavasa : ‘येरे येरे पावसा’ सिनेमाचा टीझर रिलीज; 17 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित
Ye Re Ye Re Pavasa : ‘येरे येरे पावसा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ye Re Ye Re Pavasa : ‘येरे येरे पावसा’ (Ye Re Ye Re Pavasa) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छोटयांची मोठ्ठी गोष्ट सांगणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. टीझरमधील बालकलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
पाऊस येण्याआधीच मातीचा सुंगध संपूर्ण जगभरात दरवळला आहे. आता या निरागस पावसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. खट्याळ मुलांसोबतची ‘येरे येरे पावसा’ सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर चांगलीच गाजते आहे. या वर्षीचा सर्वात आतुरतेचा पाऊस, येतोय तुम्हाला भिजवायला असं म्हणत सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'येरे येरे पावसा' हा सिनेमा पावसाच्या दुष्काळावर भाष्य करणारा असला तरी कोणत्याही चांगल्या कामासाठी जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार हा महत्त्वपूर्ण असल्याचे सिनेमा दाखवून देतो. या दोघांसोबत या सिनेमात छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, प्रदीप नवले, चिन्मयी साळवी, प्राजक्ता वाड्ये, वैभव पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.
अनेक चित्रपट महोत्सवांत उमटवली मोहोर
शारीक खान यांनी ‘येरे येरे पावसा’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ अशा अनेक चित्रपट महोत्सवांत मोहोर उमटवलेला हा सिनेमा प्रेक्षकांना 17 जूनला पाहायला मिळणार आहे. 14 देशातल्या 31 चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या सिनेमाने 22 नामांकन आणि 16 पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत. एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांनी सहनिर्मिती केली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना बालकलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
शफल खान यांनी 'येरे येरे पावसा' या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात विनायकने ‘रघु’ तर आर्यने ‘सलमान’ ही भूमिका साकारली आहे. ‘लहानांना मोठ्ठं आणि मोठ्ठयांना परत लहान’ करणारा पाऊस जेव्हा रुसतो त्यावेळी येणाऱ्या भीषण परिस्थितीवर आपल्या कल्पकतेने मात देणाऱ्या लहानग्यांची गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा सिनेमा आहे.
टीझर पाहा :
संबंधित बातम्या