एक्स्प्लोर

Ye Re Ye Re Pavasa : पुरस्कार पटकावून परदेशातही नाव गाजवणारा ‘येरे येरे पावसा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ye Re Ye Re Pavasa : ‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ या आणि अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने मोहोर उमटवली आहे.

Ye Re Ye Re Pavasa : पाऊस... कधी धुक्यांच्या कुशीत कुंद होऊन बरसणारा तर कधी धो-धो कोसळणारा...कधी हवाहवासा वाटणारा तर कधी जीव नकोसा करणारा ... त्याची प्रतिक्षा मात्र सगळ्यांना असते. एका छोटयाशा खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ (Ye Re Ye Re Pavasa)  हा आगामी मराठी चित्रपट.

छाया कदम (Chhaya Kadam), मिलिंद शिंदे (Milind Shinde), संदेश जाधव,  चिन्मयी साळवी, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ या आणि अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटवणारा हा चित्रपट 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 14 देशातल्या 31 चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या चित्रपटाने 22 नामांकन आणि 16 पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून, दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून, सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे.

ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून, संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन, तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahatma Gandhi:महात्मा गांधींचं पुण्याशी काय आहे कनेक्शन?'एबीपी माझा'चा विशेष रिपोर्टABP Majha Headlines : 3 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda's Misfire Incident : रिव्हॉल्वरचा ट्रिगर गोविंदाने दाबल्याचा पोलिसांना संशय #abpमाझाAjit Pawar on Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना बोनस नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
Iran vs Israel : इराणनं 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला, इस्त्रायलकडून व्हिडीओ शेअर करत मनसुबे जाहीर, जगाचं टेन्शन वाढणार
इस्त्रायलनं व्हिडीओ शेअर केला, इराणमध्ये हल्ला कुठं करणार याचे संकेत दिले, जगाचं टेन्शन वाढणार
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
Embed widget