एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठ्या पडद्यावर साकारणार 1000 कोटींचा महाभारत सिनेमा
कोच्ची : सध्या बाहुबली-2 या सिनेमाची रिलीज होण्यापूर्वीच सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागातील भव्यतेने अनेकांना मोहित केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या भागातही तिच भव्यता पाहायला मिळेल,अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यामुळे या सिनेमाची सर्वच उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. पण अशीच भव्यता आणखी एका सिनेमात पाहायला मिळणार असून, या सिनेमासाठी तब्बल 1000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
मोहनलाल यांनी सांगितलंय की, आजपर्यंत महाभारत हे माहकाव्य कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धच दाखवलं गेलं होतं. पण पहिल्यांदा भीमाच्या व्यक्तीरेखेवर या सिनेमाची कथा आधारलेली असणार आहे.
सिनेमाचा सर्व खर्च यूएईमधील एक भारतीय व्यापारी करणार आहे. तसेच सिनेमाची निर्मिती दोन भागात होणार असून, याचं शूटिंग सप्टेंबर 2018 मध्ये सुरु होणार आहे. तर 2020 पर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होईल. सिनेमाचा दुसरा भाग पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर 90 दिवसातच चित्रपटगृहात दाखल होईल.
या सिनेमाचे निर्माते बी. आर. शेट्टींच्या कंपनीने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या पत्रकातून हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, मल्याळी, कन्नड, तामिळ आणि तेलगू आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
विशेष म्हणजे, या सिनेमात मोहनलाल यांच्यासह हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलावंत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाच्या निर्मितीसाठी नियोजन सुरु आहे. महाभारत मोठ्या पडद्यावर साकारणे हे आपलं स्वप्न असल्याचं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने एकदा सांगितलं होतं. त्यामुळे या नव्या सिनेमात शाहरुख खान कोणती तरी व्यक्तीरेखा साकारेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, बाहुबली-2 हा सिनेमा सध्या प्रदर्शनासाठी सज्ज असून, या सिनेमाच्या निर्मितीसाठी अंदाजे 250 कोटी खर्च आला. तर मोहनलाल यांच्या 'द महाभारत'साठी 1000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या
राजमौलींच्या नव्या सिनेमाचा विषय ठरला, बिग बी, आमीर एकत्र
PHOTO: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…
‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट
रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर
VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement