एक्स्प्लोर

सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्महाऊसवरील घटना, संकट टळल्याची माहिती

Salman Khan farmhouse : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खान याची प्रकृती चांगली असल्याचे समजते.

Salman Khan :  बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्म हाऊसजवळ सापाने दंश केला असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात  उपचार करण्यात आले. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आज सकाळी 9 वाजता सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले. 

नाताळची सुट्टी आणि सोमवारी 27 डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान आणि त्याच्या जवळचे मित्र पनवेल येथील फार्म हाऊसवर होते. सुट्टीच्या काळात सलमान खान पनवेल येथील फार्म हाऊसवर येत असतो. शनिवारी मध्यरात्री सलमान खान फार्म हाऊस बाहेर पडला होता. त्याच वेळी त्याच्या पायाला सापाने दंश केला. सापाने दंश केल्याचे समोर आल्यानंतर तातडीने प्राथमिक उपचारानंतर कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


सलमान खानला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सापाने दंश केला.  त्यानंतर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास सलमान खानला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार केल्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणाची गुप्तता बाळगण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सोमवारी, 27 डिसेंबर रोजी सलमान खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फार्म हाऊसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आज, रविवारीदेखील काही सेलिब्रेटी फार्म हाऊसवर येणार होते. मात्र, या घटनेनंतर सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सलमान खान या फार्म हाऊसवर कुटुंबीयांसह, जवळच्या मित्रांसह येत असतो. कोरोना लॉकडाउनच्या काळात सलमान खान आणि जवळचे काही मित्र या फार्म हाऊसवर वास्तव्यास होते. त्यावेळी त्याने शेतीदेखील केली होती. त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

पाहा व्हिडिओ : अभिनेता सलमान खानला सर्पदंश, साप बिनविषारी असल्यानं अनर्थ टळला

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget