एक्स्प्लोर
उरी हल्ल्याचा निषेध, गायक कुमार सानूंचा पाक दौरा रद्द

नवी दिल्ली : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांच्या मनात पाकिस्तानविरोधात संताप आहे. ही सर्व परिस्थिती पाहता आणि उरी हल्ल्याचा निषेध म्हणून प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. कुमार सानू हे 26 सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. येत्या 26 सप्टेंबरला पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये भारतीय गायक कुमार सानू सहभागी होणार होते. मात्र, उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कुमार सानू यांनी आपला दौरा रद्द केला आहे. 'मैं अपने देश और सेना को प्यार और सम्मान करता हूं.', असे म्हणत कुमार सानू यांनी लाहोरमधील संगीत कार्यक्रमाला जाण्याचं रद्द केलं आहे. उरीमधील दहशतवादी हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यातील सर्व दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. उरी हल्ल्याचा बॉलिवूडमधूनही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























